Home चंद्रपूर महत्वाची बातमी :- आता लैगिक छळाची तक्रार जिल्हा स्तरावर स्थापित तक्रार समितीकडे.

महत्वाची बातमी :- आता लैगिक छळाची तक्रार जिल्हा स्तरावर स्थापित तक्रार समितीकडे.

 

स्थापित समितीमध्ये कोण आहेत महिला पदाधिकारी? जाणून घ्या.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

सार्वजनिक कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ व नियम दि. ९/१२/२०१३ तसेच संदर्भ क्रं. ३ च्या शासन निर्णयाप्रमाणे चंद्रपुर जिल्हयाकरीता संदर्भ क्र ४ अन्वये स्थानिक तक्रार समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीचा ३ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने या आदेशान्वये सदर्भ क्र ५ नुसार आता पुन्हा स्थानिक तक्रार समिती पुर्नगठीत करण्यात आलेली आहे.

ज्या कार्यालयात १० पेक्षा कमी कर्मचारी असतील अश्या कार्यालयातील महिला, अंसघटित क्षेत्रातील कर्मचारी महिला तसेच ज्या महिलांची तक्रार नियुक्ती प्राधिकाऱ्यांविरुध्द आहे अश्या सर्व महिला कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैगिक छळाची तक्रार जिल्हा स्तरावर स्थापित स्थानिक तक्रार समिती मध्ये तक्रार करु शकतील. पिडीत महिलेची तक्रार समिती कडे प्राप्त होताच अधिनियम व नियमांनुसार तक्रारीवर योग्य ती कार्यवाही करुन पिडीत महिलेस न्याय मिळवून देण्याकरिता समिती कटीबध्द असेल व त्या अनुषंगाने कार्यवाही करेल.

चंद्रपूर जिल्हयाकरिता कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीची चौकशी / चौकशी अहवालानुसार संबंधितावरील कार्यवाहीसाठी आपले अभिप्राय (Report of its findings) स्थानिक तक्रार समितीने चौकशी पूर्ण झाल्यापासून तदनंतरच्या पुढील १० दिवसात (Ten days) जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे सादर करणे समितीला बंधनकारक राहील. कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम २०१३ व नियम दि. २९/१२/२०१३ यामध्ये विहित केलेल्या तरतुदीनुसार करण्याकरिता खालील प्रमाणे शासकीय व अशासकीय सदस्यांची स्थानिक तक्रार समिती स्थापित करण्यात येत आहे.

कोण आहेत या जिल्हा तक्रार समिती मधे पदाधिकारी? नामनिर्देशित सदस्यांची नावे.

अध्यक्षा म्हणून श्रीमती. अँड मनिषा विनोद नखाते – राह. नेहा अपार्टमेंट, दुसरा मजला, राजमल पुगलीया नगर, चंद्रपूर. मो. नं. ९४२२९१०३३०

सदस्या म्हणून श्रीमती. अँड. क्षमा विजय बासरकर – राह. व्ही आय पी प्लाझा, मनोमय नर्सिंग होम जवळ, रामनगर, चंद्रपुर मो. नं.८४८४०८२२२४

श्रीमती. योगिता ज लांडगे – राह. तहसिल कचेरीजवळ, सलीम नगर, ता. वरोरा, जि. चंद्रपूर. मो. नं. ९८८१४९४७९५

श्रीमती. पल्लवी घाटगे-
उपजिल्हाधिकारी (रोहयो), जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर

Previous articleशक्ती विधेयक काल विधानसभेत एकमताने मंजूर,बलात्कार करणारा आरोपी सुटणार नाही?
Next articleखळबळजनक :- मनसेच्या विरोधात चक्क भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांचा आंदोलनात सहभाग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here