Home वरोरा खळबळजनक :- मनसेच्या विरोधात चक्क भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांचा आंदोलनात सहभाग.

खळबळजनक :- मनसेच्या विरोधात चक्क भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांचा आंदोलनात सहभाग.

 

नगरपरिषदतर्फे निकृष्ट दर्जाचे काम लपविण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नाटक?

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा शहरात भाजप काँग्रेस व राष्ट्रवादी च्या नगरसेवक यांच्यासह नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांच्या विरोधात आंदोलन केल्याने एकच खळबळ उडाली असून नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या बाजूने चक्क नगराध्यक्ष का आले? याबद्दल तर्क वितर्क लावले जात आहे.

शहरात निकृष्ट दर्जाचे सिमेंट रस्ते झाल्याने काही महिन्यातच त्यावर पडलेल्या भेगा व सिमेंट उखडल्याने शहरातील जनतेत निर्माण झालेला असंतोष यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष वैभव डहाने यांनी वेळोवेळी नगरपरिषद प्रशासनाला निवेदने दिली होती, या दरम्यान दरम्यान सिमेंट रस्त्यांवर पडलेल्या भेगा व उखडलेले सिमेंट यावर लीपापोती करून भ्रष्टाचार लपविण्यासाठी ऐन सुट्टीच्या दिवशी नगरपरिषद अभियंता पुनवटकर हे रस्त्यांचे बांधकाम कंत्राटदार यांच्या सोबत त्या उखडलेल्या सिमेंट रस्त्यांवर सिमेंट पाणी टाकून तात्पुरती डागडुजी करीत असल्याचे लक्षात येताच त्यांनी उपस्थित अभियंता पुनवटकर यांना या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत विचारणा केली असता त्यांनी कुठल्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही.त्यामुळे संतापलेल्या वैभव डहाने यांनी सरळ सिमेंट पाणीच त्यांच्या तोंडाला फासून नगरपरिषद प्रशासनाकडून होत असलेल्या भ्रष्टाचाराचा निषेध केला. पण सुट्टीच्या दिवशी सुद्धा अभियंता जणू कामावर होते हे दाखवून पोलीस स्टेशन मधे राजकीय दबाव टाकून तक्रार देण्यात आली व मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाने व सोबत असलेल्या राहुल खारकर यांच्या विरुद्ध कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात न्यायालयात अटकपूर्व जामीन करिता अर्जाची सुनावणी सुरू आहे, मात्र नगरपरिषद सत्ताधारी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना समोर करून मनसे तालुका अध्यक्ष यांना अटकपूर्व जामीन मिळू नये याकरिता आज आंदोलन करण्यात आले आहे.

वरोरा नगरपरिषद तर्फे शहरातील मुख्य रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे, त्यामुळे सिमेंट रस्ता काही महिन्याच्या आताच खराब झाल्याने शहरातील काही सुज्ञ नागरिकांनी याबाबत आक्षेप घेतला होता,दरम्यान ह्या क्रैक झालेल्या सिमेंट रस्त्यावर सिमेंट चे पाणी टाकून लीपापोती करण्याचे काम संबंधित ठेकेदार हे नगरपरिषद चे अभियंता पुनवटकर यांच्या उपस्थितीत करत असताना मनसे तालुका अध्यक्ष हे त्या ठिकाणी पोहचले व जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठल्या सिमेंट रस्त्यावर अशा प्रकारचे सिमेंट पाणी टाकून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याने सुट्टीच्या दिवशी अशा निकृष्ट दर्जाचे काम अभियंता कुठल्या नियमाने करत आहेत याचा जबाब विचारला असता अभियंता निमसरकर यांच्याकडे कुठलेही उत्तर नव्हते त्यामुळे चिडलेल्या मनसे तालुका अध्यक्ष डहाने यांनी संताप व्यक्त केला.

जनतेच्या पैशाचा असा दुरुपयोग व त्यातून होणारा भ्रष्टाचार संपविण्यास जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढाकार घेत असेल तर त्यांच्या सोबत किमान विरोधी पक्षाचे नगरसेवक सोबत असायला हवे पण ते चक्क सत्ताधारी यांच्या दावणीला बांधले गेले असल्याने ते सुद्धा या भ्रष्टाचारात सहभागी असल्याचे निष्पन्न होते त्यामुळे या भ्रष्ट कारभाराविरोधात शहरातील जनतेने आवाज उठवायला हवा अशी विदारक परिस्थिती दिसत आहे.

Previous articleमहत्वाची बातमी :- आता लैगिक छळाची तक्रार जिल्हा स्तरावर स्थापित तक्रार समितीकडे.
Next articleएल्गार :- सिटिपिएस मधील बि.जी.आर. या कंपनी विरोधात पैसे अडवल्या प्रकरणी आमरण उपोषण.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here