Home चंद्रपूर एल्गार :- सिटिपिएस मधील बि.जी.आर. या कंपनी विरोधात पैसे अडवल्या प्रकरणी आमरण...

एल्गार :- सिटिपिएस मधील बि.जी.आर. या कंपनी विरोधात पैसे अडवल्या प्रकरणी आमरण उपोषण.

 

केंद्रीय मानवाधिकार संगठण ,नवी दिल्ली यांचा उपोषणाला जाहीर पाठिंबा.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर महऔष्णिक विद्युत केंद्राच्या १००० मेगावॅट विस्तारित प्रकल्पात कंत्राटी स्वरूपात काम केलेल्या अनेक लहान मोठ्या कंत्राटदारांचे पैसे बि. जी. आर. या कंपनीने कारण नसतानाही रोखून ठेवले असल्याने त्या छोट्या कंत्राटदारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे, त्या आंदोलनाला केंद्रीय मानवाधिकार संगठण, नवी दिल्ली चे महाराष्ट्र उपाध्यक्ष विवेक बारसिंगे आणि महाराष्ट्र महासचिव नीलेश हिवराळे यांनी भेट देऊन त्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

स्मॉल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या नावाने सर्व लहान कंत्राटदार एकवटले असून सन २०१४ पासून काम केलेल्या या कंत्राटदाराचे अजूनही जवळपास ६ कोटी रुपयांहून अधिकची रक्कम बी.जी.आर. या कंपनीने रोखून ठेवली आहे.दरम्यान कंत्राटी काम केलेल्या या लहान मोठ्या कंत्राटदारांनी आपले कामाचे पैसे मिळावे म्हणून अनेकदा बि.जी. आर. या कंपनीच्या चेन्नई येथील मुख्य कार्यालयाला सुद्धा प्रत्यक्ष भेट दिली. तसेच महाजनको च्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा प्रत्यक्ष भेट देत अनेकदा पत्रव्यवहार केले. परंतु अजूनही त्यांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संबंधित मुख्य कंत्राटी कंपनी बि. जी. आर. च्या निषेधार्थ स्मॉल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नाईलाजास्तव उपोषणाला सुरुवात केली.

बि.जी.आर. या कंपनीने महाजनको कडून पैशाची उचल केल्यानंतरही या लहान मोठ्या कंत्राटदाराचे पैसे दिले नाही व आता जोपर्यंत कंपनी या कंत्राटदारांचे हक्काचे पैसे देणार नाही, तोपर्यंत या उपोषणातून माघार घेणार नाही अशी भूमिका स्मॉल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी काल व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here