Home मुंबई पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणीचा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर.

पत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणीचा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर.

 

या राज्यस्तरीय पुरस्काराचे मानकरी ठरले प्रा.महेश पानसे, राजू कुकडे व मनिष रक्षमवार.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व दै.मराठवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या “सकारात्मक लेखन” या विषयावरील प़तिष्टेच्या राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली असून लवकरच शानदार कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दै. मराठवाडा यांच्या आयोजकांनी दिली आहे.

या पुरस्कारासाठी पत्रकारिता क्षेत्रातील नामवंत पत्रकारांची घोषणा करण्यात आली असून राज्यस्तरीय पुरस्कारांसोबत प्रत्येक विभागातून तीन पुरस्कार व प्रोत्साहनपर पुरस्कार सुद्धा देण्यात येणार आहेत. लवकरच या पुरस्कारांचे वितरण एका शानदार कार्यक्रमात होणार असल्याची माहिती दै.मराठवाडा व संस्थापक संपादक पत्रमहर्षी स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमाचे आयोजक यांनी दिली आहे.

यंदा पुरस्कार मिळविणाऱ्या राज्यभरातील निवडक व्यक्तींमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुवं विदर्भ अध्यक्ष व जेष्ट पत्रकार प्रा.महेश पानसे, साप्ताहिक तथा न्यूज पोर्टल भुमिपुत्राची हाक चे संपादक राजुभाऊ कुकडे,खबर महाराष्ट्राची चे संपादक मनिष रक्षमवार यांचा समावेष करण्यात आला आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार वितरण सोहळा दर्पण दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई आणि दै.मराठवाडा साथीच्या वतीने थाटात संपन होणार आहे. दै.मराठवाडा साथीचे संस्थापक संपादक स्व.मोहनलालजी बियाणी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मागिल दोन वर्षांपासून हे पुरस्कार देण्यात येत आहेत.

संयोजकांच्या वतीने सकारात्मक लेखन हा विषय पुरस्कारासाठी ठेवण्यात आला होता. प्रत्येक विभागातून मोठ्या प्रमाणात स्पर्धेसाठी प्रवेशिका आल्या होत्या. निवड समितीने पुरस्कारांसाठी आलेल्या साहित्यांचे परिक्षण करून पुरस्कार विजेत्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. पुरस्कारप्राप्त सर्वांचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, दै. मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष डॉ.प्रभू गोरे यांनी अभिनंदन केले आहे.

सर्व मान्यवर पत्रकारांना व मागिल वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कार प्राप्त मान्यवर पत्रकारांना जानेवारी महिण्यात भव्य सोहळ्यात पुरस्कार वितरीत करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, दै. मराठवाडा साथीचे मुख्य संपादक चंदुलाल बियाणी यांनी सांगितले.

Previous articleएल्गार :- सिटिपिएस मधील बि.जी.आर. या कंपनी विरोधात पैसे अडवल्या प्रकरणी आमरण उपोषण.
Next articleवरोरा येथील खांजी व मालवीय वार्ड अतिक्रमण धारकांना मिळणार जागेचे पट्टे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here