Home वरोरा वरोरा येथील खांजी व मालवीय वार्ड अतिक्रमण धारकांना मिळणार जागेचे पट्टे?

वरोरा येथील खांजी व मालवीय वार्ड अतिक्रमण धारकांना मिळणार जागेचे पट्टे?

 

किशोर नानाजी पारधी यांच्या प्रयत्नाने यश मिळण्याची शक्यता.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा खांजी येथील मालविय प्रभाग क्र. १ मध्ये अतिक्रमण धारकाना मागील अनेक वर्षापासून शासनस्तरावरून कायमस्वरूपी पटटे मिळाले नाही. अनेक नागरिक शासनाचे विविध योजनाचे लाभापासून वंचित आहे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते किशोर नानाजी पारधी यांनी स्थानिक खासदार, आमदार, पालकमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री, महसुल मंत्री जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार मुख्याधिकारी, नगर रचनाकार यांना सन २०१९ पासून निवेदन देवून सदर प्रकरणे सादर केले होते.

या सतत च्या पाठपुराव्याने दिनांक ११.११ २०२१ ला तहसिलदार वरोरा यांनी मंडळ अधिकारी व तलाठी यांना नागरिकांचे निवासी घरे व वाणिज्यीक प्रकरणबाबत मालविय प्रभाग क १ व तलावाचे पाळीला लागून संबंधिताचे मौका चौकशी (सर्वे) करून किती वर्षापासून अतिक्रमणे आहे व त्याबाबत नियमानुसार शासकिय दंड भरला आहे किंवा कसे याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याबाबतचा आदेश दिला होता

दरम्यान दि. १६.१२.२०२१ पासून प्रत्यक्ष सर्व्हे सुरू झाला असून त्यामुळे वरोरा येथील मालविय प्रभाग क्रं. १ येथील निवासी व वाणिज्य अशा दोन्ही अतिक्रमण धारकांना याचा लाभ मिळेल असे बोलल्या जात आहे. जर प्रशासनाकडून सदर नागरिकांना पट्टे दिले तर त्यांना पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सर्वाना २०२२ ला घरे या योजनेचा फायदा होणार व व्यावसायिकांना सुध्दा शासकीय योजनाचा लाभ मिळणार आहे.

तहसिलदार, उपअधिक्षक भूमि अभिलेख, वरोरा यांचे कार्यालयाकडून अतिक्रमण धारकांचे जागेची मोजणी करण्याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल, स्थळदर्शक नकाशा, वहिवाट कब्जा, आखीव पत्रिका, इत्यादी दस्तावेज मागवून तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, नगर रचनाकार शासन यांना अहवाल सादर करून वरोरा शहरातील अतिक्रमण धारक निवासी व व्यावसायिक यांना शासन अधिसुचना ८ मार्च २०१९ नुसार अधिनियमातील अधिमुल्याची चालान रक्कम शासनाला जमा करण्याबाबत अतिक्रमणधारक निवासी व वाणिज्यीक नागरिकांना शासन चालान देणार व सर्व अतिक्रमणधारक चालानची रक्कम बँकेत भरणार व शासनाकडून अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पटटे मिळणार असल्याने वरोरा शहरातील अतिक्रमण धारक निवासी व वाणिज्य नागरिकांच्या बेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

Previous articleपत्रमहर्षी स्व. मोहनलालजी बियाणीचा राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर.
Next articleमहाराष्ट्र व्हॉलीबाल संघाच्या व्यवस्थापक पदी जय मानकर तर स. प्रशिक्षक म्हणून रवी बन्सोड यांची निवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here