Home भद्रावती महाराष्ट्र व्हॉलीबाल संघाच्या व्यवस्थापक पदी जय मानकर तर स. प्रशिक्षक म्हणून...

महाराष्ट्र व्हॉलीबाल संघाच्या व्यवस्थापक पदी जय मानकर तर स. प्रशिक्षक म्हणून रवी बन्सोड यांची निवड.

महाराष्ट्र व्हॉलीबाल संघात भद्रावती मधीलच दोघांच्याही निवडीने भद्रावतीकराकडून अभिनंदनाचा वर्षाव.

भद्रावती प्रतिनिधी :-

दि. २४ ते ३० डिसेंबर २०२१  या कालावधीत भारतीय व्हॉलीबॉल महासंघ  व पश्चीम बंगाल व्हॉलीबॉल असोसिएशनच्या वतीने ४७ व्या ज्युनियर मुले -मुली राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन बरधमन पश्चीम बंगाल येथे करण्यात आले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सहभागी होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलांच्या  संघाचे व्यवस्थापक म्हणून स्थानिक पंचशील वार्डाचे रहिवासी शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख वसंता मानकर यांचा मुलगा जय वसंता मानकर तर या संघाचे  सहाय्यक प्रशिक्षक म्हणून  स्थानिक सुरक्षा नगर येथील रवि बाळकृष्ण बन्सोड यांची  निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे  सहसचिव गजानन जिवतोडे , भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे सचिव डॉ. कार्तीक शिंदे आणि  विवेकानंद स्पोर्टिंग क्लबचे राजेश मत्ते  यांनी जय मानकर व रवि बन्सोड यांचे अभिनंदन केले आहे. सदर संघ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना झाला आहे. महाराष्ट्र व्हॉलीबाल संघात भद्रावती मधीलच दोघांच्या ही निवड झाल्याने भद्रावतीकराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here