Home वरोरा रंगेल असलेला ग्रामसेवक शेंडे हा रंगेहाथ सापडला एसीबीच्या जाळ्यात.

रंगेल असलेला ग्रामसेवक शेंडे हा रंगेहाथ सापडला एसीबीच्या जाळ्यात.

 

तक्रारकर्त्याच्या बाजूने अहवाल देण्याच्या नावाखाली मागितली होती ५ हजाराची लाच.

वरोरा प्रतिनिधी :-

तालुक्यातील आटमुर्डीचे ग्रामसेवक लोकेश शेन्डे यांच्या भ्रष्ट कारभाराच्या अनेक रंगेल चर्चा तालुक्यात रंगत असताना अखेर त्याची मस्ती जीरली आणि तो एका तक्रारकर्त्याला त्याच्या बाजूने अहवाल देण्याच्या भानगडीत ५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला गेला. पैसे घेतल्याशिवाय कुणाचे कामच करायचे नाही हा जणू मुलमंत्र जोपसणारे अनेक ग्रामसेवक पटवारी हे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक शोषण करतात व बाहेर रंगरलिया करून पैसे उधळतात त्यामुळे सामान्य माणसाला न्याय मिळत नाही ही शोकांतिका म्हणावी लागेल.

तक्रारदाराच्या बाजूने अहवाल देण्यासाठी वरोरा तालुक्यातील आटमुर्डी येथील ग्रामसेवकाने तक्रारदाराला 5 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली, मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला व वरोरा शहरातील पंचायत समितीच्या कार्यालयासमोर सापळा रचून लोकेश शेंडे या ग्रामसेवकाला 5 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली.

तक्रारदार यांच्या चुलत बहिणीच्या शेतात बाजूला राहणाऱ्या नागरिकांच्या घरचे सांडपाणी येत असल्याने शेतातील पिकाचे नुकसान होत होते यावर तक्रारदाराने संबंधितांवर कारवाई करण्याबाबत उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्या कार्यालयात अर्ज केला असता पुढील कारवाई साठी तो अर्ज ग्रामसेवक लोकेश शेंडे यांच्याकडे पाठविण्यात आला. मात्र तक्रारदाराला तुमच्या बाजूने अहवाल देतो पण त्यासाठी 5 हजार रुपये लागेल अशी मागणी ग्रामसेवक शेंडे यांनी केली, पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार अर्ज दाखल केला. चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे यांनी तक्रारीची पडताळणी केल्यावर 27 डिसेंम्बरला सापळा रचत 5 हजार रुपये रंगेहात घेताना ग्रामसेवक शेंडे यांना अटक करण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला सो.,ला.प्र.वि. नागपूर, मिलिंद तोतरे, अपर पोलीस अधीक्षक, ला प्र वि नागपूर, मधुकर गिते ,अपर पोलीस अधीक्षक ला प्र वि नागपूर यांच्या मार्गदर्शनात अविनाश भामरे पोलीस उपअधीक्षक, नापोशि अजय बागेसर, रोशन चांदेकर, रवी ढेंगळे, पोशी.वैभव गाडगे,चालक पोशी.सतिश सिडाम सर्व ला.प्र.वि. चंद्रपूर यांनी केली.

Previous articleमहाराष्ट्र व्हॉलीबाल संघाच्या व्यवस्थापक पदी जय मानकर तर स. प्रशिक्षक म्हणून रवी बन्सोड यांची निवड.
Next articleउद्दोजकता:- महिला बचत गटांच्या माध्यमातून खेड्यात नवी आर्थिक क्रांती आणणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here