Home वरोरा उद्दोजकता:- महिला बचत गटांच्या माध्यमातून खेड्यात नवी आर्थिक क्रांती आणणार.

उद्दोजकता:- महिला बचत गटांच्या माध्यमातून खेड्यात नवी आर्थिक क्रांती आणणार.

यशस्वी ऊद्दोजक तथा मनसे नेते रमेश राजूरकर यांची चिनोरा या गावात आयोजित महिला बचत गट कार्यशाळेत ग्वाही.

वरोरा प्रतिनिधी :-

देशाची आर्थिक घडी जशी औद्धौगिक क्रांती आणून बसवीता येते तशीच ग्रामीण भागात महिलांना छोटे छोटे ऊद्दोग देऊन जर आत्मनिर्भर केले तर खेड्यात नवी आर्थिक क्रांती घडू शकते आणि त्यामुळेच ग्रामीण भागातील महिलांना आम्ही वेगवेगळे प्रशिक्षण देऊन त्यांना उद्दोगी बनवू व खेड्यात नवी आर्थिक क्रांती आणू अशी ग्वाही मनसे नेते रमेश राजूरकर यांनी चिनोरा येथे दिनांक 27.12.2021 रोजी ग्रामपंचायत चिनोरा मधील सांस्कृतीक भवन मध्ये भरगच्छ महिला बचत गटाच्या कार्यशाळेत बोलताना दिली.

महिला बचत गटाच्या महिला सामूहिक ऊद्दोग करून किती उत्पन्न घेऊ शकतात व त्यासाठी किती भांडवल उभारावे लागते याचे तंतोतंत आर्थिक गणित सांगताना रमेश राजूरकर यांनी महिलांच्या आर्थिक उन्नतीचे गमक समजावून सांगितले.यावेळी महिलांना ग्रामीण भागात नैसर्गिक रित्या कमी खर्चात मोठी आर्थिक उलाढाल कशी करता येईल व त्यासाठी कोणता ऊद्दोग महिला करू शकतात याबद्दल वस्तू बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.

गुरूदेव स्वच्छ जल संस्था” व “आत्मा जनधन वनधन विकास परीषद” यांचे संयुक्त विद्यमाने रोजगार व स्वयंरोजगार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळे मध्ये गुलाबजल, गंगाजल, गोमुत्र, चमेली तेल, चंदन पावडर, मुलताणी मीट्टी, लिपबांब, हर्बल वॅक्सीन, फेसपॅक, बॉडी लोशन, मॉस्चराईजर क्रिम, हर्बल मसाला, शॅम्पु, हेअर मेहंदी, निलगीरी तेल, एरंडी तेल, नेल थिनर, नेल पॉलीश, आफूटर सेविंग लोशन, सॅनीटायझर, ऑफीस गम, बोरीक अॅसीड, कॅरम पावडर, ब्लिचींग पावडर इत्यादी वस्तुचे प्रात्याशिक करून दाखवण्यात आले.
महिला बचत गटाच्या या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन यशस्वी ऊद्दोजक रमेश राजुरकर तसेच माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे,सरपंच श्रीमती ताई अरून परचाके, येन्सा सरपंच रविंद्रजी भोयर, श्रीमती सुशीला तेलमोरे व गावातील इतर मान्यवर उपस्थित होते.या कार्यशाळेत चिनोरा य गावसह इतर गावातील बचत गटाची मोठी उपस्थिती होती.

 

Previous articleरंगेल असलेला ग्रामसेवक शेंडे हा रंगेहाथ सापडला एसीबीच्या जाळ्यात.
Next articleदखल न्यूज :- स्थानिक सीटीपीएस कंपनीच्या प्लांट 8 च्या मेन्टेनन्सचे काय आहे छडयंत्र?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here