Home चंद्रपूर दखल न्यूज :- स्थानिक सीटीपीएस कंपनीच्या प्लांट 8 च्या मेन्टेनन्सचे काय आहे...

दखल न्यूज :- स्थानिक सीटीपीएस कंपनीच्या प्लांट 8 च्या मेन्टेनन्सचे काय आहे छडयंत्र?

बायलर व टरबाइन मेन्टेनन्सचे कारण समोर करून जवळपास 70 लाख रुपयाची छोट्या मोठ्या कंत्राटदाराला दिली कामे?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात प्लांट क्रमांक 8 मधे कन्वर्टर बेल्ट सह स्ट्रक्ट्रर जाळल्याने तिथे मोठी बिघाड आली होती व नंतर त्यामधे सुधारणा पण करण्यात आली होती मात्र त्याचा फायदा घेत व्यवस्थापनाने मेन्टेनन्सच्या नावाखाली तब्बल 70 लाख  रुपयाची कामे काढण्यात आले असल्याची माहिती असून त्या कामाचे वाटप सुद्धा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे,

चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याच्या बातम्या नेहमीच वर्तमानपत्रात प्रकाशित होत असतात, पण पुरावेच संबंधित व्यवस्थापन दडपून टाकत असल्याने आजपर्यंत कुणावर मोठी कारवाई झाली नाही, इथे भावना कन्स्ट्रक्शन (जार्ज कुटी) तिरुपती कन्स्ट्रक्शन(चवरे ) खंडेलवाल, विजय कन्स्ट्रक्शन (विजय गीते) इत्यादींवर चौकशी झाली पण यांना ब्लैकलिस्ट मधे न टाकता त्यांना पुन्हा नव्याने कंत्राटे मिळाली.

प्लांट क्रमांक 8 च्या मेन्टेनन्सची कामे करत असताना ती कामे नेमकी कुठल्या तांत्रिक बाबी ला धरून देण्यात आली व त्याच कंत्राटदाराला ती देण्यात आली याचा लेखाजोखा जर समोर आला तर चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात होत असलेला भ्रष्टाचार समोर येऊ शकतो या संदर्भात नवनवीन खुलासे समोर येण्याची चिन्हे दिसत असून भ्रष्टाचाराने पोखरलेल्या या केंद्रात कुणी इमानदार मिळेल का? याचा शोध घेणे आता कठीण होऊन बसले आहे. दरम्यान संबंधित कंत्राटदार कोण आहेत व त्यांना कशी कामे मिळाली याचा इतिहास फार रोमांचक असल्याची चर्चा रंगणार आहे,

Previous articleउद्दोजकता:- महिला बचत गटांच्या माध्यमातून खेड्यात नवी आर्थिक क्रांती आणणार.
Next articleवरोरा तालुक्यात वायगाव (भोयर) येथे मनसेची शाखा कार्यकारणी गठित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here