Home वरोरा वरोरा तालुक्यात वायगाव (भोयर) येथे मनसेची शाखा कार्यकारणी गठित.

वरोरा तालुक्यात वायगाव (भोयर) येथे मनसेची शाखा कार्यकारणी गठित.

अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मनसे पक्षात प्रवेश.गाव तिथे मनसे हा संकल्प सुरूच.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यात आता गावागावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा गठित करण्याचे काम सुरू असून तालुक्यातील वायगाव( भोयर ) इथे नुकतीच शाखा गठित करण्यात आली आहे. या वेळी अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश घेऊन पक्ष बळकट करण्याचा संकल्प केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखा बांधणीचे काम वरोरा तालुक्यात मनसे नेते रमेश राजूरकर,जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे,तालुका अध्यक्ष वैभव डहाने,तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी,विभाग अध्यक्ष राजेंद्र धाबेकर यांच्या नेत्रूत्वात जोमाने सुरू असून तालुक्यातील गावागावात मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा तरुण युवकांमधे असलेला प्रचंड विश्वास बघता मनसे पदाधिकाऱ्यांनी केलेला गाव तिथे मनसे हा संकल्प पूर्णत्वाला जाण्याची चिन्हे दिसत आहे. वरोरा तालुक्यातील जवळपास डझनवर स्थापित झालेल्या शाखांचे जाळे आता विस्तारत आहे.

वायगाव येथे झालेल्या मनसे शाखा कार्यक्रमात मनसे नेते रमेश राजूरकर यांनी गावातील युवकांना स्वयंरोजगार करण्याचे आवाहन करून मी आपल्या रोजगार निर्मितीसाठी सदैव प्रयत्न करीत असल्याचे सांगून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विकास आराखडा मधील भविष्याचा ज्या पद्धतीने वेध घेतला ते पाहता आपण आपल्या भागात त्या दिशेने प्रयत्न करू या असे आवाहन सुद्धा त्यांनी केले.

वायगाव (भोयर) भोयर इथे झालेल्या मनसे शाखा कार्यकारणी मधे शाखा अध्यक्ष- प्रमोद हनवते. शाखा उपाध्यक्षा – विलास दडमल. गट अध्यक्ष – प्रफुल्ल दडमल. शाखा सचिव – उमेश दडमल. सहसचिव- किशोर जांभूळे. शाखा संघटक – राजू मानकर इत्यादींची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी मनसे नेते रमेश राजूरकर, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी, महाराष्ट्र सैनिक मनोज गाठले. वायगाव येथील वन सरक्षण समिती अध्यक्ष मनोहर ऊजवलकर .गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष अनिल गरमाडे, बबनरावजी डडमल. मधुकर आत्राम. कुंडलिक उताणे इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती

Previous articleदखल न्यूज :- स्थानिक सीटीपीएस कंपनीच्या प्लांट 8 च्या मेन्टेनन्सचे काय आहे छडयंत्र?
Next articleधक्कादायक :- बाहेरून पोलीस भरती प्रशिक्षण संस्था, आतमध्ये बनावट दारू निर्मिती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here