Home क्राईम स्टोरी धक्कादायक :- बाहेरून पोलीस भरती प्रशिक्षण संस्था, आतमध्ये बनावट दारू निर्मिती.

धक्कादायक :- बाहेरून पोलीस भरती प्रशिक्षण संस्था, आतमध्ये बनावट दारू निर्मिती.

 

राज्य उत्पादन शुल्क विभागाची करवाई १९ लाख पेक्षा जास्त रुपयाचा मुद्देमाल जप्त.

न्यूज नेटवर्क :-

राज्यात बनावट दारू मोठ्या प्रमाणात बनविल्या व विकल्या जात असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचायला मिळतात पण त्या बनावट दारू निर्मिती करणाऱ्यांवर तात्पुरती कारवाई होऊन पुन्हा नव्याने तो व्यवसाय सुरू होतो. चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा अशा प्रकारची चर्चा होत असते मात्र राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद विभागाने मोठी कारवाई करत बनावट दारूच्या कारखान्यावर छापा टाकला आहे. विशेष म्हणजे हा कारखाना पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण संस्थेच्या आत सुरू होता. त्यामुळे कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकाला हे पाहून धक्काच बसला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या आडगांव येथील जय जवान सैनिक पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण संस्थेचा मालक अशोक डवले हा अन्य साथीदारासह सदर प्रशिक्षण संस्थेच्या मोठ्या दोन खोल्यात बेकायदेशिरपणे देशी दारू उत्पादनाचा कारखाना चालवित होता. गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळताच, राज्य उत्पादन शुल्क औरंगाबाद शहर विभागाचे निरीक्षक शरद फटांगडे व निरीक्षक जावेद कुरेशी यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला असता बनावट दारू निर्मीती करण्यासाठी लागणाऱ्या १९ लाख ७ हजार १६० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

बनावट दारू निर्मीती करणाऱ्या या कारखान्यात छापा टाकल्यानंतर जितेंद्र सिंग श्रीतेजभान सिंग, रवि सिंग श्रीब्रीजभान सिंग, जयबली सिंग श्रीबन्सराखन सिंग, प्रशांत अनिल खैरनार, चैतन्य रामकृष्ण म्हेसकर, यांना ताब्यात घेऊन मुंबई दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अशोक किसन डवले व त्याचे अन्य नऊ साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Previous articleवरोरा तालुक्यात वायगाव (भोयर) येथे मनसेची शाखा कार्यकारणी गठित.
Next articleपंचनामा :- पोलीस पाटील दीपक शेंबळकर यांच्या विरोधामुळे ऋषि-नीलिमाचा संसार तुटणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here