मनसेची एसीबी च्या पोलीस अधीक्षकांकडे मागणी होणार, RTO च्या दरमहा 8 कोटीपेक्षा वरील अवैध वसुलीचा करणार पर्दापाश.
चंद्रपूर :-
चंद्रपुर जिल्हयामध्ये लक्कडकोट गावाच्या महाराष्ट्र आणि तेलंगना बॉर्डर वर RTO विभागाचा चेक पोस्टवर ट्रक गाड्यांच्या ड्राइवर कडून 500 ते 1000 रुपये एंट्री फी च्या नावावर घेणाऱ्या RTO च्या सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक शिवाजी मच्छींद्र विभुते यांना लक्कडकोट सिमा नाक्यावर त्यांच्या खाजगी एजंट सह एसीबी च्या अमरावती टीम ने 500 रुपयाची लाच घेतांना रंगेहात पकडल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती, मात्र शिवाजी मच्छींद्र विभुते हेच केवळ यामध्ये दोषी नसून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे हे प्रमुख आरोपी आहे आणि त्यांच्याच आदेशाने ही अवैध वसुली सुरु असून महिन्याकाठी या चेक पोस्ट वरून किमान 1 कोटी रुपयाची उलाढाल होतं आहे आणि यात सर्व RTO अधिकारी यांचा वाटा असल्याची माहिती आहे, दरम्यान एसीबी अधिकाऱ्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांना अटक करा अशी मागणी मनसे कडून करण्यात येणार आहे.
शनिवारी लक्कडकोट आरटीओ चेकनाका येथील कार्यालयात तक्रारदार ट्रान्सपोर्टर यांनी तडजोडीअंती लक्कडकोट आरटीओ चेकनाका येथे एका खाजगी एजन्ट आणि सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक शिवाजी मच्छींद्र विभुते यांना ५००/- रू. लाच देतांना रंगेहात अटक केली होती, मात्र या कार्यवाहीत इतर दोन अधिकारी पवार आणि गुरनुले यांची नावे एफआयआर मधून गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त होतं असतांना मनसे कडून मुख्य आरोपी म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांना या प्रकरणी अटक करावी अशी मागणी होतं आहे, या संदर्भात लवकरच RTO कार्यालयातील दरमहा 8 कोटीवरील अवैध वसुलीचा भंडाफोड मनसे पदाधिकारी लवकरच करणार असल्याची पण माहिती आहे.