Home Breaking News धारदार दोन तलवारीसहित दोन आरोपींना अटक पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन,यांची बल्लारपूर मध्ये...

धारदार दोन तलवारीसहित दोन आरोपींना अटक पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन,यांची बल्लारपूर मध्ये कारवाई….

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  बल्लारपूर सणासुदीच्या तोंडावर गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याकरिता रेकॉर्ड वरील गुन्हेगाराचा शोध घेत असता दोन आरोपींना दोन तलवार सहित बल्लारपूर पोलीसांनी अटक केलेली आहे,

३१ ऑगस्ट ला बल्लारपूर पोलीस आगामी सण उत्सव दरम्यान रेकॉर्ड वरील गुन्हेगाराचा शोध घेत असता त्यांना माहिती मिळाली की राणी लक्ष्मी वॉर्ड येथे विधी संघर्षग्रस्त बालक लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देश्याने तलवार लपवून ठेवले आहे.

त्या विधी संघर्षग्रस्त बालकाला पोलीसांनी अटक केली असनु. किल्ला वॉर्ड येथील झाडी झुडपात आरोपी गौरव सुनील कुकूडकर वय १८ वर्ष यांनी तलवार लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्याचा शोध घेत आरोपी गौरव कुकूडकर किल्ला वॉर्ड याला अटक करण्यात आली. दोन्ही आरोपीवर कलम ४, २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये कारवाई करण्यात आले आहे.

सदर कारवाई पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु, जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदुर अतिरिक्त कार्यभार राजुरा यांचे मार्गदर्शनात सुनिल वि. गाडे पोलीस निरीक्षक, सफौ.

गजानन डोहीफोडे, पोहवा. रणविजय ठाकुर, सुनिल कामटकर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार पोअं. श्रिनिवास वाभिटकर, विकास जुमनाके, लखन चव्हाण, खंडेराव माने, वशिष्ट रंगारी, शेखर माथनकर इ. स्टॉफ यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here