Home चंद्रपूर महिला सुरक्षेसाठी मध्यरात्री रॅली चंद्रपुरात महिलांवरील अत्याचाराविरोधात मशाल मोर्चा, समाजाने एकजुटीने केला...

महिला सुरक्षेसाठी मध्यरात्री रॅली चंद्रपुरात महिलांवरील अत्याचाराविरोधात मशाल मोर्चा, समाजाने एकजुटीने केला निषेध…..

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :- नुकत्याच चंद्रपूर जिल्ह्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडल्या या अत्याचाराच्या निषेधार्थ चंद्रपुरात भव्य मशाल मोर्चा काढण्यात आला. ‘चंद्रपूर जागृती मंच’च्या बॅनरखाली हा मोर्चा काढण्यात आला, त्यात विविध सामाजिक संघटना आणि सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

गांधी चौकातून रात्री नऊ वाजता मशाल मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात खासदार प्रतिभा धानोरकर, अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, शिक्षक आमदार सुधाकर अडबाळे, सामाजिक कार्यकर्त्या अभिलाषा गावतुरे यांच्यासह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. महाविद्यालयीन युवक, युवती आणि तृतीयपंथीय समाजातील लोकही या मोर्चात मशाल घेऊन जोरदार घोषणा देत दिसून आले.

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड, वरोरा, बल्लारपूर आदी ठिकाणी गेल्या आठ दिवसांत महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बदलापूरच्या घटनेने राज्यातील समाजही हादरला आहे. या घटनांमुळे दुखावलेल्या समाजाने या मोर्चाद्वारे संताप व्यक्त केला.

रात्री 11 वाजता प्रियदर्शनी चौकात मोर्चाची सांगता झाली, तेथे उपस्थितांना महिलांच्या सन्मानाची व सुरक्षिततेची शपथ देण्यात आली. या ज्वलंत प्रश्नावर समाजाची एकजूट आणि निषेध सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here