वरोरा येथील विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकांना चोप देण्याच्या इराद्याने सामाजिक कार्यकर्ते वैभव डहाणे यांनी केला हल्ल्याचा प्रयत्न ?
वरोरा :-
शहरात एका नामांकित कनिष्ठ महाविद्यालयातील दोन शिक्षकांनी विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न व विनयभंग केल्याने शहरात संतापाची लाट उसळली होती, दरम्यान बजरंग दल व इतर सामाजिक संघटनानी संताप व्यक्त करत आरोपी प्रमोद बेलेकर आणि धनंजय पारखे यांना चोप देण्याची तयारी केली होती, ज्या पवित्र ज्ञान मंदिरात आपल्या शिष्य असलेल्या विद्यार्थिनीवर वाईट नजर ठेऊन तिचेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न म्हणजे त्या शिक्षकांची मानसिकता एखाद्या जनावरासारखी असल्याचे स्पष्ट दिसत असल्याने ह्या नराधम शिक्षकांना सार्वजनिक स्थळी चोप मिळणे आवश्यक असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होतं होती, दरम्यान पोलीस कोठडीतुन आरोपी शिक्षकांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कस्टडी मिळाली आणि न्यायालयातून त्यांना कारागृहात पोलीस गाडीत बसवून नेत असतांना सामाजिक कार्यकर्ता वैभव डहाने यांनी पोलीस गाडीत बसलेल्या शिक्षकांवर हल्ला करण्याचा प्रयन केल्याने एकच खळबळ उडाली, दरम्यान पोलिसांनी वैभव डहाने यांना अटक केली.
कारागृहात रवानगी कारण्यात आलेल्या त्या शिक्षकांचे अनेक कारणामे समोर येत असून प्रमोद बेलेकर या शिक्षकाची ही तिसरी वेळ असल्याचे बोलल्या जातं आहे, गरीब मुलीवर वाईट नजर ठेऊन तिला मोबाईल सारखी वस्तू भेट देऊन आपल्या पाशात ओढायचं आणि मग आपली वासना भागवायची असला घाणेरडा खेळ खेळणाऱ्या या शिक्षकांनी अख्खे शिक्षण क्षेत्र बदनाम केले आहे, आता आपल्या मुलीला शाळेत पाठवायचे की नाही अशा द्विधा मानसिकतेत पालक असून ज्या शाळेत शिस्त असल्याचा कांगावा केला जातो त्या शाळेत विद्यार्थिनीवर शिक्षकच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असेल तर मग मुली सुरक्षित कशा राहतील हा मोठा गंभीर प्रश्न उपस्थित होतं आहे.