Home चंद्रपूर निकृष्ट अन्न पुरवणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका – माजी नगरसेवक सचिन भोयर…..

निकृष्ट अन्न पुरवणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका – माजी नगरसेवक सचिन भोयर…..

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर   :-  समाजकल्याण विभागांतर्गत मागासवर्गा वसतिगृहात शिक्षणाच्या गुणवत्तेच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण दिले जात असल्याची माहिती माजी नगरसेवक सचिन भोयर यांना समजताच त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाईचे आदेश दिले.

ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना दिल्या. ते म्हणाले की, सरकार तुम्हाला पैसे देते, तुम्ही निकृष्ट अन्न का देता? ही अडचण पाहून माजी नगरसेवक सचिन भोयर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना अन्न पुरवठा ठेकेदार निकृष्ट, कीटकयुक्त व शिळे अन्न पुरवत असल्याचे समजावून सांगितले.

व तात्काळ सुधारणा करून विद्यार्थ्यांना पोटभर जेवण देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी वसतिगृह आणि स्वयंपाकघराची पाहणी केली आणि सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here