मनसेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी.
खरे आरोपी प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आंनद मेश्राम हेच असल्याने त्यांचेवर गुन्हे दाखल करण्याची मागणी.
चंद्रपूर :-
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती येथील पथकाने RTO च्या सिमा नाका लक्कडकोट येथे एका ट्रॅक चालकांकडून 500 रुपयाची लाच घेतांना सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक शिवाजी विभुते यांच्यासह एका खाजगी एजंट ला दिनांक 21/2/2025 ला रंगेहात अटक केली होती, दरम्यान राजुरा पोलीस स्टेशनं येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु RTO च्या लक्कडकोट सिमा नाका वसुली करण्याचे आदेश हे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आंनद मेश्राम यांनी दिले असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, त्यासाठी सत्यता पडताळणी करायची असेल तर अटक झालेल्या सहाय्यक निरीक्षक शिवाजी विभुते यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष महेश वासलवार, उमाशंकर तिवारी व मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. दरम्यान या एसीबी च्या कार्यवाहीत मोटार वाहन निरीक्षक गोविंद पवार यांना परस्पर सोडण्यात आल्याची चर्चा असून आरोपी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक शिवाजी विभुते यांची सुद्धा जमानत रविवारला झाल्याने या प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची कुजबुज सुरु आहे.या प्रकरणी मनसे वाहतूक सेनेकडून किरण मोरे आणि आनंद मेश्राम यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अध्यक्ष यांच्याकडे तक्रार केली आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जातं असल्याने किरण मोरे सह मेश्राम यांना अटक होणार कां याबद्दल चर्चा सुरु आहे.
चंद्रपूर प्रादेशिक परिवहन कार्यालय हे भ्रष्टाचाराचे मॉडेल बनले असून ह्या मॉडेल चा खरे हिरो उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे आहेत तर दुसरे साईड हिरो RTO अधिकारी आंनद मेश्राम हे आहेत, त्यांच्याच आदेशाने केंद्र शासनाने बंद केलेल्या लक्कडकोट येथील सिमा नाक्यावर बेकायदेशीरपणे हजारो हायवा ट्रक व जड वाहन चालकांकडून एंट्री फी च्या नावावर प्रत्येक वाहन 500/- ते 1000/- रुपये येथे ड्युटीवर असलेल्या RTO वाहन निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व त्यांनी नियुक्त केलेले खाजगी एजन्ट यांच्या माध्यमातून गोळा केले जातात, हा गोळा झालेला प्रत्येक दिवशीचा पैसा जवळपास 3 ते 5 लाख एवढा गोळा होतो, अशाच प्रकारे प्रत्येक ट्रक चालकांकडून 500 रुपये घेतांना अमरावती एसीबी च्या पथकाने सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक शिवाजी विभुते यांच्यासह एका खाजगी एजंट ला दिनांक 21/2/2025 ला लाच घेतांना रंगेहात अटक केली होती, परंतु या कार्यवाहीत पुन्हा निरीक्षक गोविंद पवार ह्या RTO अधिकारी यांचे नाव गुन्ह्यात असायला हवे पण त्यांच्यावर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नसल्याचे कळते, दरम्यान ह्या प्रकरणात आरोपी शिवाजी विभुते यांची नार्को टेस्ट केल्यास खरे आरोपी प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मेश्राम यांची नावे समोर येऊ शकते. कारण त्यांच्या आदेशानेचं ही अवैध वसुली सिमा नाक्यावर सुरु असल्याचा आरोप मनसे कडून करण्यात आला आहे.
काय आहे RTO च्या वसुलीची स्थिती?
चंद्रपूर RTO अधिकारी हे केवळ सिमा नाक्यावरूनच अवैध वसुली करत नसून जिल्ह्यातील 10 हजार पेक्षा वर असलेल्या हायवा, ट्रक टिप्पर व ट्रॅक्टर चालक मालक यांच्याकडून ते एंट्री फी च्या नावाखाली 3500/- ते 5000/- रुपये एजंट मार्फत वसुली करत असतें ती रक्कम जवळपास 4 कोटीच्या जवळपास आहे, चंद्रपूर येथे असलेले सिमेंट उद्योग, लोह कंपन्या व कोळसा खाणी यामध्ये दररोज गडचिरोली यवतमाळ जिल्ह्यातील वाहने यासंह आंध्र प्रदेश, तेलंगना, मध्यप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश छत्तीसगड या प्रांतातील वाहने चंद्रपूर जिल्ह्यात येतात त्यांच्याकडून सुद्धा एंट्री फी च्या नावावर RTO अधिकारी व एजंट मार्फत पैसे वसुल केल्या जाते त्याची रक्कम महिन्याकाठी जवळपास एक कोटीच्या घरात आहे. चंद्रपूर RTO कार्यालयात पासिंग, फिटनेस, लायसन्स, ट्रान्सफर इत्यादी कामासाठी दर ठरलेले आहेत त्यापोटी जवळपास महिन्याकाठी 3 कोटीची वसुली होतं असतें, हे सर्व कामे करण्यासाठी RTO किरण मोरे यांनी खाजगी एजंट नियुक्त करून पैसे गोळा करण्याचे काम सुरु आहे.
कोण आहेत एजंट?
RTO चंद्रपूर कार्यालयात वसुली करण्यासाठी अरुण टोगे, रवी निवलकर, संजय नगराळे, राहुल नगराळे, देवा गोंगले, दिपक खाडीलकर, रमेश नळे, मनोज घडसे, गणवीर, कुणाल नगराळे, पंकज, अतुल माळवे व इतर यांच्या नियुक्त्या किरण मोरे यांनी केल्या आहेत व ते सायंकाळी हा हिशोब केल्या जातो, सदर पूर्ण वसुली ची रक्कम ही महिन्याकाठी जवळपास 8 कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे व हा पैसा सगळ्यांचे तोंड बंद करण्यासाठी व आमदार खासदार आणि मोठे पत्रकार यांना मैनेज करून महिन्याकाठी कोट्यावधी रुपयाचे गभन RTO अधिकारी करत आहे.
काय आहेत आरोप?
दिनांक 21/2/2025 ला अमरावती एसीबी ने केलेली कार्यवाही ही एक माध्यम आहे, पण त्यामागे महिन्याकाठी 8 कोटींची रक्कम गोळा करून मोठा घोटाळा सुरु आहेत, एकीकडे सर्वसामान्य जनतेच्या गाडयांना चालन करून श्रीमंत व राजकीय नेत्यांना सूट देऊन कोट्यावधी चा जो घोळ सुरु आहे त्याचा संपूर्ण तपास एसीबी ने करावा व या सर्व प्रकरणात प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम हेच खरे एसीबी कार्यवाहीचे आरोपी आहेत, त्यामुळे ज्या सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक शिवाजी विभुते यांच्यासह खाजगी एजंट ला अटक केली आहे त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी जेणेकरून वर्षाकाठी जवळपास 80 ते 90 कोटींचा घोटाळा करणारे आरोपी समोर येईल, या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेने तर्फे RTO किरण मोरे व आनंद मेश्राम यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी मोठे जनआंदोलन करण्यात येणार असल्याचा पण इशारा देण्यात आला आहे.