Home भद्रावती पंचनामा :- पोलीस पाटील दीपक शेंबळकर यांच्या विरोधामुळे ऋषि-नीलिमाचा संसार तुटणार?

पंचनामा :- पोलीस पाटील दीपक शेंबळकर यांच्या विरोधामुळे ऋषि-नीलिमाचा संसार तुटणार?

 

पोलीस पाटील दीपक शेंबळकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी मनसे सरसावली.

वरोरा प्रतिनिधी :-

ऋषि शेंबळकर व नीलिमा यांच्यात प्रेमाचे सूत जुळल्यानंतर दोघांनीही चंद्रपूर येथे रजिस्ट्रार येथे प्रेम विवाह करून सोबत संसार थाटण्याची शपथ घेतली होती. दरम्यानच्या काळात नीलिमाची परीक्षा असल्याने सोबत न राहाता आपापल्या घरी राहायचे व दिवाळी झाल्यानंतर मग घरच्यांना सांगून एकत्र ऋषि शेंबळकर याच्या घरी नीलिमा पत्नी म्हणून जाणार होती. परंतु दोघांनीही लपून लग्न केल्याचे मुलगी नीलिमा हिच्या आई वडिलाला कळताच त्यांनी गावाचे पोलीस पाटील दीपक शेंबळकर यांना याबाबत सांगितले, कायद्याने दोघांचे लग्न झाले असताना व दोघांचे एकमेकांवर प्रेम असून पती पत्नी म्हणून एकत्र राहण्याचा निर्णय केल्यानंतर गावचा पोलीस पाटील हा मध्यस्थ म्हणून कायद्याची बाजू घेणे अपेक्षित होते, मात्र खुद्द पोलीस पाटील दीपक शेंबळकरने ऋषि व नीलिमा यांच्यात झालेला प्रेम विवाह मोडण्याचे कारस्थान रचले व स्थानिक पोलीस स्टेशन शेगाव येथे चक्क मुलीवर बळजबरी करून खोटी तक्रार द्यायला लावली, त्यामुळे आता पोलीस पाटीलच कायद्याचे रक्षण करू शकत नसेल तर असे पोलीस पाटील काय कामाचे? म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे हे जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन त्या दीपक शेंबळकर नावाच्या पोलीस पाटलाला निलंबित करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आहे.

ऋषि शेंबळकर याने कु. नीलिमा उमेश डुकरे हीचेशी दिनांक 2/3/2021 ला चंद्रपूर येथे कायदेशीर लग्न केल्यानंतर ही माहिती घरच्यांना माहिती झाली त्यामुळे मुलीला वेगवेगळ्या पद्धतीने धमकी देऊन व मुलीच्या घरचे मुलीला मुलाकडे पाठवायला तयार नव्हते त्यामुळे मुलाने शेगाव पोलीस स्टेशन मधे याबाबत तक्रार दिली होती. पण दिनांक 22/11/2021 ला मुलाची तक्रार पोलीस स्टेशन शेगाव इथे घेतली नाही. या दरम्यान ठाणेदार यांनी मुलावरच दबाव टाकून तू तिच्यापासून अलग हो तुम्हच्या वयात अंतर आहे असे म्हटले. त्यामुळे मुलाने वरोरा पोलीस स्टेशन मधील महिला तक्रार केंद्रात दिनांक 8/12/2021 ला तक्रार दिली व त्या अनुषंगाने दिनांक 15/12/2021 ला सुनावणी ठेवली होती.

त्या सुनावणीसाठी मुलामुलींचे चंद्रपूर न्यायालयात झालेले लग्नाचे दस्तावेज पती पत्नी म्हणून फोटो विडिओ व इतर पुरावे सादर केले. यावेळी महिला तक्रार निवारण केंद्रात मुलीने संबंधित महिला अधिकारी याना मी स्वमजीने लग्न केले व मी यांची पत्नी आहे असे निक्षून सांगितले मात्र माझ्या आई वडिलांचा व मामाचा यासाठी विरोध असल्याने मी यांच्याशी जावू शकत नाही असे सांगितले.

यावेळी समुपदेशन करणाऱ्या महिला अधिकारी सौ.योगीता लांडगे यांनी नीलिमा हिची सविस्तर विचारपूस केल्यानंतर ती मुलासोबत त्याच्या घरी यायला तयार होती असे दिसल्या नंतर दोघांनाही 24 डिसेंबरला पुन्हा सुनावणीची तारीख ठेवली पण पोलीस पाटील दीपक शेंबळकर यांनी जाणीवपूर्वक मुलीला महिला तक्रार निवारण केंद्रात येऊ दिले नाही. त्यामुळे कायद्याचे रक्षण करण्यासाठी पोलीस पाटलाची नियुक्ती झाली असताना ते जर कायदा पायाखाली तुडवून पती पत्नीच्या भांडणात चुकीची बाजू घेत असेल तर कायद्याने तो दोषी असून त्याचेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे हे करणार असल्याने आता त्यांच्यावर काय करवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Previous articleधक्कादायक :- बाहेरून पोलीस भरती प्रशिक्षण संस्था, आतमध्ये बनावट दारू निर्मिती.
Next articleपंचनामा :- पोलीस पाटील दीपक शेंबळकर यांच्या विरोधामुळे ऋषि-नीलिमाचा संसार तुटणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here