Home चंद्रपूर धक्कादायक :- शिक्षक, कर्मचारी सहकारी पत संस्थेत भ्रष्टाचाराचा पैसा ?

धक्कादायक :- शिक्षक, कर्मचारी सहकारी पत संस्थेत भ्रष्टाचाराचा पैसा ?

आयकर लपविण्याचा डाव खेळला जातं असतांना शासनाचे लेखापरिक्षक साखर झोपेत ?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रासह शासकीय अधिकारी, कंत्राटदार व बिल्डर यांनी आयकर वाचविण्यासाठी नवी शक्कल लढवली असून त्यांनी बेकायदेशीर शिक्षक व कर्मचारी सहकारी पत संस्थेत ठेवी ठेऊन कोट्यावधी रुपयांचा शासनाचा आयकर बुडविला असल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत असून यामध्ये जी लोकं सामील आहे त्यांची पोलखोल लवकरच समोर येण्याची चिन्ह आहे.

सहकार कायदा अधिनियम अंतर्गत ज्या पत संस्था हया शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या असतात तिथे सभासद नसलेल्या व शिक्षक किंव्हा कर्मचारी नसलेल्या बाहेरील व्यक्तींना या पतसंस्थेत ठेवी ठेवता येत नाही परंतु सहकार कायदा वाऱ्यावर सोडून जिल्ह्यातील शिक्षक व कर्मचारी पत संस्थेत बेकायदेशीरपणे कोट्यावधी रुपयांच्या ठेवी व त्यातून व्यवहार केल्याची माहिती समोर आल्याने या सहकारी पत संस्थेत मोठा घोटाळा झाल्याची खमंग चर्चा असून या संदर्भात शासनाचे लेखा परीक्षक नेमके काय करतात ? हा प्रश्न विचारल्या जातं आहे. सदर संस्थेच्या या बेकायदेशीर ठेवीच्या माध्यमातून इथे मोठ्या प्रमाणांत भ्रष्टाचाराचा पैसा गुंतवला जातं असल्याने संस्थेच्या अध्यक्षासह संचालक मंडळावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी होतं आहे. दरम्यान एका जिल्हा बैंक मधे झालेल्या घोटाळ्याची रक्कम सदर सहकारी पत संस्थेत आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने संस्थेचे अध्यक्ष यांच्यासह संचालक मंडळ गोत्यात येणार आहे. आता हे प्रकरण कुणाच्या अंगावर येईल हे येणाऱ्या काही दिवसांतच समोर येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here