Home चंद्रपूर खळबळजनक :- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पाटील सह दोघे एसीबीच्या जाळ्यात.

खळबळजनक :- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पाटील सह दोघे एसीबीच्या जाळ्यात.

बिअर शॉपीच्या लायसन्स करिता मागितली होती एक लाखाची लाच,

अधीक्षक पाटील यांच्या संपूर्ण संपत्तीची व लायसन्स प्रकरणाची चौकशी करण्याची मनसेची मागणी.

चंद्रपूर :-

जिल्ह्यात बेकायदेशीरपणे सुरु असलेली दारू व परवाना धारक यांच्याकडून हप्तेखोरी यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर होतेच, मात्र अतिशय शातीरपणे हप्तेखोरीचा धंदा यांचा चालायचा, मात्र आता घुग्गुस येथील एका नवीन बिअर शॉपी लायसन्स देण्याच्या नावाखाली लाच मागितली असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिल्याने आज त्यांनी सापळा रचून अधिक्षक संजय जयसिंगराव पाटील, उपनिरीक्षक चेतन माधवराव खरोडे, कार्यालय अधिक्षक खटाल यांना रंगेहात पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती समोर आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे, दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांनी कोट्यावधी रुपयाची माया जमवली असल्याने त्यांच्या संपतीची चौकशी करून व यांच्या माध्यमातून आजपर्यंत दिलेले परवाने याची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी केली आहे.

जिल्ह्यात दारूबंदी उठल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांनी शेकडो बिअर बार, वाईन शॉपी, देशी दारू दुकान व ताडी दुकान संचालकाकडून कोट्यावधी रुपयाची माया लायसन्स रिन्युअल च्या नावाखाली कमावली सोबतच नवीन बिअर बार बिअर शॉपी व वाईन शॉपी ट्रान्सफर च्या नवीन लायसन्स च्या नावाखाली पुन्हा कोट्यावधी रुपयाची माया जमवली होती, दरम्यान काही दारू दुकानें ही बेकायदेशीरपणे वाटण्यात आले होते, त्यामुळे कित्तेक तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आल्या होत्या मात्र संजय पाटील यांनी त्यात वेळ मारून नेऊन स्वतःला वाचवीण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आता त्यांचे बिंग फुटले असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकनीकर यांच्याकड़े घुगगूस येथील एका बिअर शॉपीच्या संचालकांनी तक्रार देऊन नवीन बिअर शॉपी करिता एक लाख रुपयाची लाच मागितली असल्याने एसीबी च्या अधिकारी यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयातील अधिक्षक संजय जयसिंगराव पाटील, उपनिरीक्षक चेतन माधवराव खरोडे, कार्यालय अधिक्षक खटाल यांना रंगेहात पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असल्याची माहिती आहे,

सदरची कार्यवाही ही राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र. वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टॉफ पो. हवा. नरेशकुमार नन्नावरे, पो. हवा. हिवराज नेवारे, ना.पो.अं. संदेश वाघमारे, पो. अ. राकेश जांभुळकर, पो.अ. प्रदिप ताडाम, म.पो.अं. पुष्पा काचोळे व चापोकों सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.

चंद्रपूर जिल्हयातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतीरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here