Home चंद्रपूर रानडुक्कराची शिकार व मांस विक्री करणाऱ्या ७ आरोपींना अटक

रानडुक्कराची शिकार व मांस विक्री करणाऱ्या ७ आरोपींना अटक

रानडुक्कराची शिकार व मांस विक्री करणाऱ्या ७ आरोपींना अटक

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर:-बल्लारपुर -7 मे रोजी अवैधरित्या रानडुक्कर या वन्यप्राण्याची शिकार करुन मांस विक्री करीता वाहतुक करीत असल्याची गुप्त माहिती नरेश भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह यांना प्राप्त झाली.

माहितीचे आधारे बल्हारपुर शहरातील सास्ती पुलीया परिसरात सापडा रचुन आरोपी श्रीकृष्ण गुलाब पवार, रा. हिरापुर, सदाशिव भास्कर देवगडे, रा. हिरापुर, वसंता यादव तोडेकर, रा. बल्हारपुर व तोमरय्या राजेय्या धोबल्ला, रा. बल्हारपुर यांना रानडुक्कर वन्यप्राण्याचे मास १० कि.ग्रा. सह ताब्यात घेतले.

वरील आरोपींची अधिक चौकशी केली असता ते रानडुक्कर वन्यप्राण्याचे मास विक्री करीत आणल्याची त्यांनी कबुली दिली. त्यांनतर मास विकत घेणारे आरोपी सुनील सदाशिव तुमराम, रा. महात्मा गांधी वार्ड बल्हारपुर, सावण सोजन बरसे, रा. गोकुलनगर वार्ड बल्हारपुर व जाणी पोचम गाजुल्ला, सुभाष नगर वार्ड बल्हारपुर यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्यांनी आरोपी वसंता यादव तोडेकर, रा. बल्हारपुर यांचे कडुन वन्यप्राण्याचे मास विकत घेत असल्याबाबत सांगितले असता वरील सर्व आरोपी विरुध्द वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम २, ९, ३९, ४४, ५१ व ५२ अनव्ये प्राथमिक वनगुन्हा क्रमांक ०८९६२/२२४०४५ दिनांक ७ मे २०२४ अन्वये वनगुन्हा जारी करण्यात आला असुन वनगुन्हात वापरण्यात आलेले २ मोटार सायकल, इतर साहित्य व रोख रक्कम १६, ८१०.०० जप्त करुन जप्तीनामा नोंदविण्यात आला. या कार्यवाही मुळे वन्यप्राण्याची शिकार करुन मास विक्री करणाऱ्या टोळीचा मोठा रॅकेट उघडकीस आला.

सदर प्रकरणाचा पुढील तपास मध्य चांदा वनविभाग, चंद्रपुर चे उपवनसंरक्षक श्रीमती. स्वेता बोड्डु व सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह नरेश रामचंद्र भोवरे हे करीत आहेत.

सदर कार्यवाही दरम्यान क्षेत्र सहाय्यक ए.एस. पठाण, के.एन. घुगलोत, बी.टी. पुरी, वनरक्षक सुधीर बोकडे, तानाजी कामले, परमेश्वर आनकाडे, सुनिल नन्नावरे, धमेन्द्र मेश्राम, एस. आर. देशमुख, ए.बी. चौधरी, एस.एस. नैताम यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here