Home Breaking News नियंत्रण सुटल्याने अपघात : कंत्राटदार गंभीर जखमी

नियंत्रण सुटल्याने अपघात : कंत्राटदार गंभीर जखमी

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

कोरची  :-  कोरची ते कुरखेडा महामार्गावरील ढोलीगोटा देवस्थानाजवळ कुरखेडावरून कोरचीला भरधाव वेगात कारनी निघालेल्या एका बांधकाम कंत्राटदाराचा या महामार्गावरच्या खड्डयात कार MH ३३ ३९३३ गेल्याने वाहनावरून नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या खाली जाऊन झाडाला जोरदार धडकली. यामध्ये वाहनचालक कंत्राटदार गंभीर जखमी झाल आहे. ही दुर्घटना मंगळवारी दुपारी ३:३० वाजता दरम्यान घडली आहे.

मोहम्मद अहमद अली कुरेशी (६३) रा. आंबेडकर वार्ड कुरखेडा असे गंभीर जखमी बांधकाम कंत्राटदाराचे नाव आहे. या कंत्राट दराचे कोरची तालुक्यामधील ग्रामीण भागात विविध प्रकारचे अनेक बांधकाम सुरू आहेत. त्यामुळे या मार्गाने नेहमीच त्यांना कोरचीला यावे लागते. कुरखेडा वरून निघाल्यावर बेळगाव घाट ओलांडल्यानंतर नाडेकल फाट्या पुढे ढोलीगोटा देवस्थान आहे.

त्या दरम्यान पुढे पाच ते सहा ठिकाणी मोठमोठे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. भरधाव वेगाची कार खड्डयात गेली आणि नियंत्रण सूटल्यामुळे कंत्राटदार कार झाडाला जोरदार धडक दिली. यामध्ये गाडीतील एअरबॅग तर निघाला पण एक पाय मोडल्याची माहिती प्राप्त झाली आहे तर डोक्यालाही गंभीर मार लागल्यामुळे त्यांना ब्रह्मपुरी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची माहिती बेळगाव पोलिसांना मिळाल्यानंतर बेळगाव पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बेळगाव पोलीस मदत केंद्रात जमा केलेली आहे. तसेच या मार्गावर पडलेल्या चार ते पाच ठिकाणच्या खड्ड्यांमध्ये यापूर्वी सुद्धा अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे वाहन चालकांकडून हे खड्डे बुजवण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here