Home क्राईम स्टोरी गंभीर :- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील कसे झाले फरार?

गंभीर :- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील कसे झाले फरार?

चंद्रपूर सह कोल्हापूरच्या घरी एसीबीच्या अधिकाऱ्यांची छापेमारी पण संजय पाटील नाशिक मध्ये असण्याची शंका.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी अधिकारी कर्मचारी यांच्यावर पण कारवाई होणार?

चंद्रपूर :-

दोन दिवसापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी एक लाख रुपयाची लाच घेतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालयीन अधीक्षक अभय खाताड तथा उपनिरीक्षक चेतन खरोटे यांना रंगेहात पकडले होते, मात्र या प्रकारणतील मुख्य आरोपी असलेले अधीक्षक संजय पाटील हे दोन दिवसापूर्वी सुट्टीवर कोल्हापूर ला त्यांच्या घरी गेल्यामुळे त्यांना अटक करण्यात आली नव्हती, दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी त्यांच्या कोल्हापूर च्या घरी छापेमारी करत त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते बहुदा नाशिक मध्ये राहून अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची सूत्रांची माहिती आहे, या प्रकरणात संजय पाटील यांना अटकपूर्व जामीन मिळणे फार कठीण असल्याने ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर शरणागती पतकरू शकतात असे सुद्धा संकेत मिळत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या या कारवाईने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणखी काही अधिकारी कर्मचारी यांच्यावर कारवाई होणार असल्याचा संशय व्यक्त होत आहे, दरमहा प्रत्येक बिअर बार, वाईन शॉपी बिअर शॉपी व देशी दारू दुकानदार यांच्याकडून हप्तेखोरी करणारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कर्मचारी व एजन्ट यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची दरवर्षी वसुली होत असतें, दरम्यान हा जमा झालेला पैसा आपसात वाटल्या जातो व त्यापैकी काही पैसा हा संबंधित मंत्र्यांना दिला जातो अशी चर्चा नेहमी होत असते, त्यामुळे या प्रकरणी आणखी किती अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here