Home वरोरा दखलपात्र :- इंडो युनिक फ्लेम कोल वॉशरी कंपनी विरोधात तक्रार करणाऱ्या सागर...

दखलपात्र :- इंडो युनिक फ्लेम कोल वॉशरी कंपनी विरोधात तक्रार करणाऱ्या सागर कासनगोट्टवारवर पण गुन्हा दाखल?

रक्कम डबल करून देण्याच्या नावाखाली कोळसा व्यापाऱ्यांची जवळपास 2 कोटीनी फसवणूक,

बी. एस. इस्पात कंपनीचे एमडी भवानी प्रसाद मिश्रा व उपाध्यक्ष सागर कासनगोट्टवार यांच्या उलट्या बोंबा?

वरोरा :-

बी. एस. इस्पात कंपनीची यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात खाजगी कोळसा खान आहे, त्या कोळसा खदाणीतून कोळसा स्वतःच्या वरोरा तालुक्यातील मजरा या ठिकाणी बिएस इस्पात कंपनीला पाहिजे म्हणून ती कोळसा खाण सरकारने मंजूर केली आहे, मात्र ती कंपनीचं बंद असल्यामुळे कंपनी संचालक खुल्या बाजारात कोळसा विकून सरकारची कोट्यावधी रुपयाची रॉयल्टी बुडवीत आहे, त्या प्रकरणाची चौकशी सुरु असताना व इंडो युनिक फ्लेम लिमिटेड कोल वॉशरी ही पाच वर्षांपासून बंद असतांना त्यां कंपनीने कोळसा वॉश केला कसा हा गंभीर प्रश्न आहे. दरम्यान बि एस. इस्पात कंपनीचे एमडी भवानी प्रसाद मिश्रा व कंपनी उपाध्यक्ष सागर कासनगोट्टूवार यांच्यावर रक्कम डबल करून देण्याच्या नावाखाली नागपूर येथील कोल ट्रेडिंग व्यापारी व इतर तीन लोकांकडून 2 कोटी ची फसवणूक केल्या प्रकरणी धंतोली पोलीस स्टेशनं येथे फ्रेंडस कॉलोनी काटोल रोड नागपुर निवासी राजेश कुमार गया सिंह (38) यांच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल आहे, हे प्रकरण सुरु असतांना आता बिएस. इस्पात कंपनीचे एमडी भवानी प्रसाद मिश्रा यांच्या निर्देशांनुसार कंपनी उपाध्यक्ष सागर कासनगोट्टूवार यांनी वरोरा पोलीस स्टेशनं येथे भाल्लर रोड येथील एम आय डी सी भागातील इंडो युनिक फ्लेम लिमिटेड कोल वॉशरी ने कोळसा वॉश च्या नावाखाली दहा कोटी रुपयाचा कोळसा हडप केल्याचे दाखवून व कोल वॉशरी चे संचालक विपुल चौधरी यांचे विरोधात तक्रार देऊन कलम 406, 407 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला बाध्य केलं आहे व या प्रकरणाचा तपास वरोरा पोलीस करीत आहे.

बी. एस इस्पात लिमिटेड कंपनी चे उपाध्यक्ष सागर कासनगोट्टवार यांच्या तक्रारी वरुन हा गुन्हा नोंद करण्यात आला खरा पण हे प्रकरण म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा आहे की काय असाच प्रकार सध्या दिसत आहे, स्टील आणि ऊर्जा प्रोजेक्ट असणाऱ्या बी. एस. इस्पात लिमिटेड कंपनी ने मुकुटबन येथील मालकीच्या कोळसा खाणीतून इंडो युनिक वॉशरी येथे कोळसा वॉश करण्याचे लेखी कंत्राट केले होते असे तक्रारीत नमूद करून
41000 मेट्रिक टन कोळसा या वॉशरीला दिला तो बी. एस. इस्पात कंपनी ला घेणे होते त्यापैकी 16000 टन च कोळसा वॉशरी ने परत केला आणि उर्वरित कोळसा देण्यास टाळाटाळ करण्यास सुरु केली, वारंवार सूचना आणि कंपनी तर्फे पत्र व्यवहार करुन सुद्धा आरोपी विपुल चौधरी यांनी कुठलाच प्रतिसाद न दिल्याने त्यांच्यावर विश्वासघात केल्याचा ठपका ठेवत बी एस इस्पात लिमिटेड कंपनी चे उपाध्यक्ष सागर कासनगोडूवार यांनी कोल वॉशरी चे संचालक विपुल चौधरी यांच्या वर दहा कोटी रुपये देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करून वरोरा पोलीस स्टेशनं येथे सोमवारला रात्री तक्रार दिली होती, परंतु एस. इस्पात कंपनीचे एमडी भवानी प्रसाद मिश्रा व कंपनी उपाध्यक्ष सागर कासनगोट्टूवार यांचे इंडो युनिक फ्लेम कोल वॉशरी चे संचालक विपुल चौधरी यांच्यासोबत जी पार्टनरशिप होती ती जाहीर होती आणि त्यांच्या बंद कोल वॉशरीमध्ये कुठलाही कोळसा वॉश होत नव्हता तर, बि एस. इस्पात कंपनीच्या मुकुटबन येथील कोळसा खाणीतून बेकायदेशीर कोळसा पाठवून व त्यां कोळंशात माती कोळसा भुकटी मिसळून वीज निर्मिती पॉवर प्लांट ला तो कोळसा विपुल चाधरी यांच्यामार्फत पाठविल्या जात होता ही वस्तुस्थिती आहे, यामध्ये बि एस. इस्पात कंपनीचे एमडी व इंडो वॉशरी चे संचालक विपुल चौधरी याची मिलींभगत होती, परंतु कोळसा हा विपुल चौधरी यांनी विकला पण त्याची रक्कम ही भवानी प्रसाद मिश्रा व कंपनी उपाध्यक्ष सागर कासनगोट्टूवार यांना दिली नसल्याने त्यांनी पोलीस तक्रार दिली आहे, विशेष बाब म्हणजे ज्याअर्थी बिएस इस्पात कोळसा खाण मुकुटबन येथे आहे त्या कोळसा खाणीतून कोळसा बाहेर विकण्यास मनाई असताना व या कंपनीला कुठल्याही पॉवर प्लांट ला कोळसा पुरवठा करण्याचे कंत्राट मिळाले नसताना इंडो युनिक फ्लेम कोल वॉशरीमध्ये बिएस इस्पात कंपनीने कोळसा कुठल्या करारानुसार पाठवला याची चौकशी करणे आवश्यक आहे.

या प्रकरणात काय आहे तथ्य?

इंडो युनिक वॉशरी येथे कोळसा वॉश करण्याचे लेखी कंत्राट बि एस. इस्पात कंपनीचे एमडी यांनी विपुल चौधरी यांना दिले होते, व जवळपास
41000 हजार काही मेट्रिक टन कोळसा या वॉशरीला दिला होता मात्र तेवढा कोळसा हा बी. एस. इस्पात कंपनी ला वॉश करून मिळाला नाही असा भवानी प्रसाद मिश्रा व कंपनी उपाध्यक्ष सागर कासनगोट्टूवार यांचा आरोप आहे, त्यापैकी केवळ 16000 टन च कोळसा वॉशरी ने परत केला आणि उर्वरित कोळसा देण्यास ते टाळाटाळ करीत असल्याची त्यांची तक्रार आहे, पण कोल वॉशरीला वॉश करण्यासाठी जो कोळसा दिल्या जातो त्यापैकी काही वेस्टेज जातो त्यामुळे किमान 20 टक्के कोळसा हा हिशोबात पकडल्या जात नाही तर मग बी. एस. इस्पात कंपनी हा कसा दावा करत आहे की 41000 हजार टन कोळसा पाठविला होता त्यापैकी 16000 टन कोळसा परत मिळाला आणि उर्वरित मिळाला नाही म्हणजे नेमका कोळसा किती परत करायचा होता? महत्वाची बाब म्हणजे जी इंडो युनिक वॉशरी मागील पाच वर्षांपासून बंद होती त्यां कंपनीत कोळसा वॉश करण्यासाठी कसा पाठविला? दोन वर्षांपूर्वी याचं इंडो युनिक वॉशरी मध्ये कोळंशाचे बिना रॉयल्टी चे ट्रक पकडल्या गेले होते ते ट्रक बी. एस. इस्पात कंपनीच्या कोळसा खाणीतून भरून आले होते ते कशासाठी? या प्रश्नांची उत्तरे बी. एस. इस्पात कंपनीचे एमडी देतील का? की कोट्यावधी रुपयाच्या या कोळसा रॉयल्टी घोटाळ्यात ते अडकणार हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here