बिरसा क्रांती दलाच्या वतीने आदिवासी जनसंवाद परिषदेचे आयोजन
चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूर :-आदिवासी समाजाचा ईतिहास शुरवीर आहे. हा सेवेकरी समाज आहे. मात्र दुस-र्यांची सेवा करत असतांना आपण मागे राहिलो. आता याची चिंता व्यक्त करण्यापेक्षा यामागच्या कारणांचे अशा आयोजनाच्या माध्यमातुन चिंतन करा, उच्च शिक्षीत होऊन संघटीत व्हा आणि समाजाच्या न्यायक मागण्यांसाठी संघर्ष करा. यात लोकप्रतिनिधी म्हणुन शेवटच्या क्षणा पर्यंत मी आपल्या सोबत राहिल असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
शहीद बाबुराव फुलेश्वर शेडमाके यांच्या जयंती निमित्त बिरसा क्रांती दलाच्या वतीने न्यू इंग्लीश शाळेच्या मैदानावर आदिवासी जनसंवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव, माजी नगरसेवक नंदु नागरकर, बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी, यंग चांदा ब्रिगेडचे आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, गिरीजा उईके, राजेंद्र मरस्कोल्हे, विष्णू कोवे, भूषण भुसे, अशोक उईके, साईराम मडावी, किरण कुंभरे, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, युथ शहर अध्यक्ष कलाकार मल्लारप, प्रदिप गेडाम, अतुल युनवते, रमेश भिसनकर, उत्तमराव मोडक, मारोती उईके आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, आदिवासी समाज हा या जिल्ह्याचा राजा आहे. हा जिल्हा तुमचा आहे. समाजातील युवकांमध्ये प्रतिभा आहे. मात्र त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. समाजासाठी शासनाच्या असलेल्या योजना प्रत्येक घरी पोहचल्या पाहिजेत. याचा समाज बांधवांनीही लाभ घेतला पाहिजे. हा समाज शिक्षणाच्या बाबतीत मागे पडत चालला ही वस्तु स्थीती नाकारल्या जाऊ शकत नाही. याकडे समाजाने लक्ष दिले पाहिजे.
समाजातील अनेक प्रश्न प्रलंबीत आहे. याची मला कल्पना आहे. ज्या समस्या जिल्हा स्तरावर सूटतील त्या सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे. तर काही प्रश्न आपण शासन दरबारी मांडुन ते सोडविण्याच्या दिशेने पाठपुरावा करत आहोत. चंद्रपूरात जात पडताळणी केंद्र सुरु करण्याची मागणी आपण केली होती. याची दखल शासनाने घेतली असुन चंद्रपूरात जात पडताळणी कार्यालय मंजुर केले आहे. यासाठी आता जागा सुनिश्चीत केल्या जात असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. समाजाच्या अभ्यासीकेसाठी आपण मोठा निधी उपलब्ध करुन दिला असल्याचेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगीतले. समाजातील प्रश्न, समस्या या आमच्या प्रयत्न पोहचव्यात त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु असेही यावेळी ते म्हणाले. या कार्यक्रमाला समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.