Home चंद्रपूर शिवाजी महाराजांचे स्मारक जटपुरा गेट येथेच व्हावे

शिवाजी महाराजांचे स्मारक जटपुरा गेट येथेच व्हावे

दिपक बेले यांची मागणी

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर :-चंद्रपूर शहरातील मुख्य मार्ग असलेले एकमेव ठिकाण जटपुरा गेट हे आहे जटपुरा गेट येथे मराठमोळा शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण म्हणून शिवाजी महारारांचे स्मारक तयार करण्यात यावे अशी इच्छा व्यक्त दिपक बेले यांनी केलेली आहे,
यासाठी शासन प्रशासनाच्या पुढाकाराने व शरिरातील संपूर्ण शिवभक्त यांनी सर्वत्र एकत्र येऊन शिवाजी महाराज स्मारकासाठी मागणी करण्यात यावे ,दरवर्षी शिवजयंती निमित्ताने शिवभक्त मोठ्या उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती साजरी केली जातात आणि मोठं मोठ्या शहरात व ग्रामीण भागात शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळा उभारण्यात आले आहेत,परंतु चंद्रपूर शहरातच शूरवीर शिवाजी महाराजांचे स्मारक नसल्याने दीपक बेले यांनी दिलगीर व्यक्त केले आहे,
चंद्रपूर शहर हे राजकीय नेत्यांनी व श्रद्धाळू भक्तांनी भरकस पणे भरलेले आहे,आणि शिवजयंती उत्सव शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते परंतु शहरात कोठेही शिवाजी महाराजांचे स्मारक नसल्याने शिवभक्तासाठी लाजिरवाणी असलेली महत्वाची बाब आहे असे दीपक बेले यांनी म्हटले आहे,
म्हणून आता तरी शिवभक्तांनी समोर येऊन येणाऱ्या शिवजयंती पर्यंत जटपुरा गेट येथे शिवाजी महाराजांचे स्मारक तयार झालेच पाहिजे अशी मागणी दीपक बेले बेले यांनी केली आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here