मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा कोरा करतो म्हणून म्हटलं. कृषिमंत्र्यांनी नाही?
लक्षवेधक:-
विदर्भातील शेतकऱ्यांसाठी लढणारा ढाण्या वाघ म्हणून माजी आमदार बच्चू कडू यांचा नेहमीच बाणा राहिला आहें, पण सत्ता गेल्यावर व आमदारकी सुद्धा गेल्यावर माणूस कसा हतबल होतो याचं जिवंत उदाहरणं म्हणजे बच्चू कडू यांचं कर्जमाफी करिता कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात आंदोलन असं म्हणावं लागेल, खरं तर राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूकीच्या प्रचार दौऱ्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि त्यांच्या सातबारा कोरा कोरा कोरा करू अशी घोषणा केली होती, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा क बोलायला तयार नसून राज्यात आर्थिक शिस्त लावण्याच्या बाता करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका ही सरकारची भूमिका असल्याचा पाढा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाचतात आणि ते चक्क शेतकऱ्यांची एक प्रकारे फसवणूक करताहेत हे स्पष्ट दिसत असतांना बच्चू कडू यांचं घोडं नेमकं कृषीमंत्राकडंचं का हाकल्या जातंय ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडं का हाकल्या जातं नाही यामध्ये कुठलं रहस्य दडलंय? याबाबत खुलासा होणं गरजेचं आहें.कारण प्रश्न हा सत्तेला विचारला जातोय आणि जो सत्तेच्या केंद्रस्थानी आहें त्याला विचारल्या जायला हवा त्याच्या खालच्या व्यक्तीला विचारून काय फायदा? असा प्रश्न बच्चू कडूच्या आंदोलनातून दिसत आहें जो अतिशय गंभीर आहें.
बच्चू कडू शेतकऱ्याच्या प्रश्नावर नेहमी सभागृह हादरून सोडतात असा त्यांचा बाणा होता, अतिशय पोटतीकडीने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारा आमदार सध्या तरी महाराष्ट्राच्या विधानसभा सभागृहात नाही, पण बच्चू कडू यांचं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करिता होतं असलेलं आंदोलन आणि सरकार ला दिला जाणारा इशारा जरा संशयाच्या भोंवऱ्यात गटांगळ्या खात आहें. कारण “जखम हाताला आणि इलाज पायाला” अशी बच्चू कडू यांची स्थिती दिसत आहें, ज्याअर्थी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूकीच्या जाहीर प्रचार सभेत शेतकऱ्यांचा सातबारा करू या कोरा कोरा कोरा असं म्हटलं होतं त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर निवासस्थानी खरं तर बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करायला हवं होतं आणि अमरावती पासून नागपूर फार दूर नाही, पण ज्या कृषी मंत्री कोकाटे यांचा कर्जमाफीशी काहीएक संबंध नसताना त्यांच्या विधानसभा क्षेत्रात जाऊन आंदोलन कारण्याचं बच्चू कडू यांचं काय लाजिक आहें हे कळायला मार्ग नाही.
बच्चू कडू हे देवेंद्र फडणवीस यांना घाबरतात?
खरं तर बच्चू कडू यांची स्वतंत्र राजकीय दुकानदारी आहें, कारण त्यांचा स्वतःचा प्रहार जनशक्ती पक्ष आहें, पण उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री काळात बच्चू कडू हे मंत्री असतांना शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेना फोडली आणि चाळीस च्या वर आमदार घेऊन ते सुरत मार्गे गुवाहाटी गेले होते त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत तुम्ही जा असं बच्चू कडू यांना सांगितल्या नंतर बच्चू कडू हे सुरत मार्गे गुवाहाटी ला गेले होते, आश्चर्यांची बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्याचं कारण त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार सोडल्याने आम्ही बाळासाहेबांच्या विचाराला संपू देणारं नाही, उद्धव ठाकरे यांच्यामुळे हिंदुत्व धोक्यात आलं आहें म्हणून आम्ही बंड केलं, पण बच्चू कडू यांचं कुठलं हिंदुत्व धोक्यात होतं हे अजूनही कुणाला कळालं नसून केवळ देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं म्हणून ते गुवाहाटी गेले असतांना एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात बच्चू कडू यांना मंत्री केलं नाही याचं शल्य मात्र बच्चू कडू यांना आहें आणि त्यांनी अनेकवेळा हे बोलून पण दाखवलं आहें, पण मग एकनाथ शिंदे सोबतं गेलेल्या आमदारांनी 50 खोके घेतल्याचा जो आरोप झाला तो आरोप बच्चू कडू यांच्यावर पण झाला कारण स्वतःचं मंत्रिपद सोडून देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून जर बच्चू कडू गुवाहाटीला गेले असतील तर ते काही मिळाल्याशिवाय गेले नसतील हे कुणीही नाकारू शकणार नाही कारण राजकारणात सौदेबाजी होते हे सत्य आहें, मागील निवडणुकीत बच्चू कडू यांना भाजप च्या उमेदवारानी हरवलं आणि हा देवेंद्र फडणवीस यांचाच गेम होता हे सुद्धा बोलल्या जातं असतांना बच्चू कडू हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घाबरतात का? असा प्रश्न निर्माण होतं आहें.
बच्चू कडू यांनी राज्य पातळीवर शेतकऱ्याचं नेतृत्व करावं?
सरकारने स्वमिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्या व शेतकऱ्यांच्या शेतपिकांना किमान आधार मूल्य दावे अशी मागणी करणारे बच्चू कडू राज्यात मंत्री झाले खरे पण त्या दरम्यान त्यांनी हे प्रश्न लावून धरले नाही, पण सध्या राज्यात शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापलं असतांना व निवडणूक काळात महायुतीकडून शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलं ते पाळलं जातं नसताना बच्चू कडू आक्रमक झाले खरे पण त्यांच्या आंदोलनाची दिशा मात्र ते भटकत असल्याचे दिसत आहें, ते म्हणतात की शेतकरी कर्जमाफीचा विषय आम्ही मुख्यमंत्र्याकडे घेऊन जाणार आहोत. आम्ही कर्जमाफीच्या बाजूने आहोत कर्जमाफी झाली पाहिजे अशी मानसिकता आहे, असं माणिकराव कोकाटे म्हणत आहेत, मग घोडं अडलं कुठे. तुम्ही घोषणा केल्यामुळे लोकांनी कर्ज भरलं नाही, त्यामुळे व्याज माफ झालं नाही. त्यामुळे आता नवीन कर्ज शेतकऱ्यांना भेटत नाही, शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. तुम्ही घोषणा केली नसती तर त्यांनी कर्ज भरलं असतं, तुम्ही घोषणा केल्यामुळे ते आता कर्ज भरत नाहीत. आम्ही कर्जमाफी झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, काही झालं तरी बहेत्तर असा इशारा बच्चू कडू यांनी शासनाला दिला आहे पण त्याचं स्वरूप अजून ठरलेलं नाही, पण येत्या काळात ते ठरावं आणि बच्चू कडू यांनी कुणालाही न घाबरता राज्यात शेतकऱ्याचं नेतृत्व करावं अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहें.