Home गडचिरोली गंभीर :- आष्टी ठाणेदार गावडे यांच्या विरोधात राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार.

गंभीर :- आष्टी ठाणेदार गावडे यांच्या विरोधात राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार.

विकास चिंचोलकर यांच्या पतीपत्नीच्या वादात ठाणेदाराची मुजोरी कुठल्या कायद्यात ?

आष्टी न्यूज नेटवर्क :

पोलिसांनी खरं तर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काम करणे अभिप्रेत असतांना व त्यांच्याकडून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आरोपी विरोधात सक्त कारवाई होने अपेक्षित असताना जर ठाणेदार स्वतःच कायदा हातात घेऊन एखाद्या पारिवारिक वादात तोंड खुपसत असेल व पतीचा हक्क हिरावून घेऊन त्याला जलील करून घराबाहेर काढत असेल तर त्या ठाणेदारावर कायदेशीर कारवाई झालीच पाहीजे,अर्थात असे सर्वसामान्य जनतेचे मत असू शकते, असाच प्रकार आष्टी पोलीस स्टेशन येथे घडला असून चक्क ठाणेदार यांनी विकास चिंचोलकर यांच्या पारिवारिक वादात त्यांना कायद्यानुसार काहीही अधिकार नसताना विकास चिंचोलकर यांना बळजबरीने घराबाहेर काढून त्यांची दोन चाकी गाडी हिसकावली व इथे यानंतर दिसायचं नाही अशी धमकी देऊन त्याला जलील करण्यात आल्याने विकास चिंचोलकर यांनी त्यांचेवर ठाणेदार गावडे यांनी केलेल्या अन्यायाविरुद्ध राज्य मानवी हक्क आयोग, पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे तकार देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आष्टी गावांत विकास चिंचोलकर व त्यांची पत्नी व एक मुलगी राहत होती दरम्यान घरगुती भांडण नेहमी होतं असल्याने काही दिवस पतीपत्नी वेगवेगळे राहत होते. यामध्ये दोघांनीही परस्परविरोधात चंद्रपूर आणि गडचिरोली येथे दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता, मात्र 8 वर्षांची एक मुलगी असल्याने दोघांनीही एकत्र राहण्याच्या अटीवर दोन्ही जिल्ह्याच्या न्यायालयात परस्परांवर असलेल्या केसेस परत घेतल्या व दोघेही आष्टी येथे एकत्र राहत होते. पण या दोघांत आष्टीमधील एक गुंड प्रव्रुत्तिचा सूरज सोयाम यांनी आपली खेळी करून विकास चिंचोलकर याला जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळं आपल्या पारिवारिक वादात तिसरा व्यक्ती कसा काय हस्तक्षेप करतोय म्हणून जवळपास तीन महिन्यांपूर्वी पतीपत्नीत वाद झाला होता. विकास चिंचोलकर याला घराबाहेर काढण्यासाठी त्याच्या पत्नीने ठाणेदार गावडे यांना घरी बोलावले व त्याला घराबाहेर काढले आणि ठाणेदार यांनी होंडा शाईन विकास कडून हिसकावून त्याला घराबाहेर काढले आणि गुन्हा दाखल करून जेल मधे पाठविण् अशी धमकी दिली. एवढेच नव्हे तर त्याच्या पत्नीला खोटी तक्रार देण्यास सांगून बिचाऱ्या विकास चिंचोलकर याला त्याच्या मुलीसमक्ष घराबाहेर हाकलले. त्यावेळी मुलगी वडिलांची इज्जत जातं असल्याने हंबरडा फोडून रडली पण निर्दयी ठाणेदार गावडे यांनी जणू सुपारी घेऊन विकास चिंचोलकर याला घराबाहेर बेइज्जत करून हाकलले.

ठाणेदार यांच्या या कृतीचा विरोध करून आपल्याला न्याय मिळावा म्हणून विकास चिंचोलकर यांनी गडचिरोली पोलीस अधीक्षक यांच्याकडे त्यांच्या वकिलांमार्फत तक्रार केली खरी पण ती तक्रार आष्टी येथील पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्याबाबत कुठलीही चौकशी न करता अर्जदार विकास चिंचोलकर याला पोलीस स्टेशन मधे बयाणाकरिता सुद्धा बोलावले नाही त्यामुळं कायदा हातात घेऊन आपला अधिकार नसताना एखाद्या व्यक्तीवर अन्याय करणे म्हणजे ठाणेदार गावडे हे पदाचादुरुपयोग करताहेत असे दिसते त्यामुळे ते स्वतः कार्यवाहीस पात्र ठरत असल्याने ठाणेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विकास चिंचोलकर यांनी राज्य मानवी हक्क आयोगासह पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्याकडे केली आहे. आता या संदर्भात काय निर्णय होते याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here