Home चंद्रपूर झोपडपट्टी अभिन्यास प्रस्तावावर मोहोरच नाही

झोपडपट्टी अभिन्यास प्रस्तावावर मोहोरच नाही

 

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :- आवास • योजनेअंतर्गत शहरातील १४ शासकीय जमिनीवरील झोपडपट्टींचे अभिन्यास प्रस्ताव मान्यतेसाठी मनपाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले. मात्र, त्यावर अजूनही मंजुरीची मोहर न उमटल्याने ४ हजार ८१५ झोपडपट्टीधारक पट्टे वाटपाच्या प्रतिक्षेत आहेत.

महानगरपालिका हद्दीत ३९ घोषित झोपडपट्टी आहेत. या झोपडपट्ट्यांमध्ये सर्वेक्षणानुसार ११ हजार ८८१ झोपडपट्ट्या असून ५९ हजार ४८९ झोपडपट्टीधारक आहेत. मनपाने १४ शासकीय जमिनीवरील झोपडपट्टींचे अभिन्यास मान्यता व पट्टे वाटपाच्या कार्यवाहीसाठी सादर केल्याची माहिती मिळताच पात्र नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या; पण, त्यावर अद्याप निर्णय झाला नाही. १४ अभिन्यासांत ४ हजार ८१५ झोपडपट्टीधारक आहेत. त्यापैकी १७ नोव्हेंबर, २०१८ नुसार प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र झोपडपट्टीधारकांची संख्या ३८० इतकी आहे व त्यापैकी ८१ झोपडपट्टी अतिक्रमणधारकांची कागदपत्रे पट्टे वाटपाच्या कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. त्यावर काय निर्णय लागते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here