Home चंद्रपूर राष्ट्रसंतांच्या संकल्पनेतील ग्रामजयंती महोत्सवाचे आयोजन राजकीय वाटेवर ?

राष्ट्रसंतांच्या संकल्पनेतील ग्रामजयंती महोत्सवाचे आयोजन राजकीय वाटेवर ?

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे अनुयायी एवढे हतबल झालेत का ?

चंद्रपूर :-

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या भजन आणि किर्तनातून अख्ख्या देशाला प्रबोधन केले आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोठे योगदान दिले, एवढेच नव्हे तर राजकारणाचं शुद्धीकरण झालं पाहीजे म्हणून त्यांनी ग्रामगीतेत मोलाचा संदेश दिला मात्र आता त्याचं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अनुयायी यांना जर एखादा महोत्सव घेताना राजकीय पुढाऱ्यांना समोर करावे लागत असेल तर मग राष्ट्रसंतांचा वारसा कसा पुढे जाणार ? हा यक्ष प्रश्न समोर उभा ठाकत आहे. खरं तर ग्रामीण जीवनात राष्ट्रसंतांनी ग्रामोन्नती कशी होईल याबद्दल आपले रोखठोक विचार ग्रामगीतेतून मांडले आहे, त्याचं ग्रामीण क्षेत्राचा विसर
आत्मानुसंधान भूवैकुंठ अड्याळ टेकडीच्या वतीने आयोजीत वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज जयंती महोत्सवाच्या समितीला पडला आहे.

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीचे औचित्य साधून चंद्रपुरातील न्यू इंग्लीश हायस्कूलच्या ग्राउंडवर १६ एप्रिलपासून तीन दिवसीय ग्रामजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शनिवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली होती. दरम्यान त्या कार्यक्रमांत आजीआजी आमदार खासदार आणि इतर लोकप्रतिनिधी व राजकीय पुढाऱ्यांना बोलावल्याने पत्रकार परिषदेत पत्रकारांनी आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांना विविध प्रश्न केले. पत्रकारांनी प्रश्न उपस्थित करतांना म्हटले की हा कार्यक्रम अड्याळ टेकडीच्या वतीने होतं आहे आणि त्या अड्याळ टेकडीचं महत्व मोठं असतांना व ग्रामीण भागाचा विकास हाच खऱ्या अर्थाने राष्ट्रसंतांचा मूळ उद्देश असतांना ग्रामीण भाग सोडून चंद्रपूर सारख्या शहरात कार्यक्रम घेऊन कुणाचे प्रबोधन होणार आहे. त्यांवर आयोजन समितीचे सकारात्मक उत्तर आले खरे पण ते मूळ उद्देशाच्या कसोटीवर खरे उतरत नाही असेच उत्तर होते.

अड्याळ टेकडीच्या वतीने आयोजीत राष्ट्रसंतांचा जयंती महोत्सव हा चांगला उपक्रम आहे. त्यात काही गैर नाही. कारण कार्यक्रमाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता सामूदायिक प्रार्थना होणार असून, अड्याळ टेकडीचे संचालक सुबोधदादा मार्गदर्शन करतील. तर ७ वाजता तुझं गावच नाही का तीर्थ या विषयावर चंदूपाटील मारकवार मार्गदर्शन करणार आहेत. रात्री ८ वाजता खोडे महाराजांचे कीर्तन होणार आहे. सोमवार १७ एप्रिलरोजी सामूदायिक ध्यान, व्यायाम व आरोग्य मार्गदर्शन होणार आहे, पण गुरुदेव भक्त एवढे हतबल होऊन राजकीय नेत्यांच्या चरणी कसे हा प्रश्न आहे, कारण राजकीय नेत्यांचे कार्यक्रम निश्चितपणे खऱ्या गुरुदेव भक्तांच्या पचनी पाडणारे नाही अशी चर्चा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here