Home चंद्रपूर शेतकरी व बेरोजगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मनसेची सभा

शेतकरी व बेरोजगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मनसेची सभा

१७ एप्रिलला सा. ५ वा. तुकूम येथे धांडे हॉस्पीटल समोर

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर : राज्यात शेतकरी व बरोजगारांचे प्रश्न गंभीर बनले आहे. अवकाळी, पूर संकटाची मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. नैसर्गीक व सुलतानी संकटाने शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे गरजेचे आहे. तसेच शेतकरी आहे. बरोबर राज्यात बेरोजगारांचे प्रश्न गंभीर बनले आहे. महागडे शिक्षण घेऊन देखील युवकांना नौकरी नाही. यामुळे पालक चिंताग्रस्त झाले आहे. युवक युवतींना भविष्याबाबत चिंता सतावत आहे. हजारो बेरोजगार युवक, युवती पुढील भविष्याची काळजीने त्रस्त आहे. यामुळे संकटग्रस्त शेतकरी व निराश आहे.

बेरोजगार यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांच्या नेतृत्वात शेतकरी व बेरोजगार सभा तथा मनसे जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन दि. १७ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता तुकूम धांडे हॉस्पीटल समोर येथे केले

मनसेच्या शेतकरी व बेरोजगार सभा व मनसे जिल्हा कार्यकर्ता मेळव्याला मनसेचे नेते प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. सभेला शेतकरी, युवक, युवतींनी मनसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here