Home गडचिरोली नौकरी च्या नावावर आदिवासी महिलांचे लैंगिक शोषण

नौकरी च्या नावावर आदिवासी महिलांचे लैंगिक शोषण

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

गडचिरोली :- नौकरी च्या नावावर आदिवासी महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याचे पत्रक गुरुपल्ली परीसरात नक्षल्यांनी लावल्याने एकच खळबळ उडाली आहे

नक्षलपत्रकातील

दाव्यामुळे गुरुपल्ली परिसरात आढळलेल्या नक्षलपत्रकात खाण ‘माफियांकडून नोकरीच्या नावावर आदिवासी महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप केल्या गेला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखनिज प्रकल्प सुरवातीपासूनच विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेला असतांनाच सूरजागड लोहप्रकल्प पुन्हा एकदा नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर आला आहे. गुरुपल्ली परिसरात आढळलेल्या नक्षलपत्रकात खाण ‘मफियां कडून नोकरीच्या नावावर आदिवासी महिलांचे लैंगिक शोषण होत असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. स्पेशल दंडकारण्य झोनल कमेटी, दक्षिण गडचिरोली प्रवक्ता कार्तिककुमारच्या नावाने हे पत्रक आहे. हा प्रकार अशोभनीय असून या बाबींवर शासनाने विचार करण्याची गरज आहे

तेव्हा आदिवासी महिलांचे लैंगिक शोषणाच्या विरोधात शासन त्वरित कारवाई करणार काय याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here