Home Breaking News हप्ते द्या नाहीतर पोलीस स्टेशनला ऑटो लावा

हप्ते द्या नाहीतर पोलीस स्टेशनला ऑटो लावा

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

ब्रेकिंग न्यूज……

शेगाव  :-  हप्ते द्या नाहीतर पोलीस स्टेशनला ऑटो लावा.. कारवाईच्या नावावर पोलिसांची वसुली..पोलीस कर्मचारी पोलीस वर्दीला काळीमा फासणाच्या प्रयत्न करीत आहे…. पाठलाग करून ऑटो पकडणे आणि मग कारवाईची धमकी देणे किंवा ऑटो पोस्टेला जमा करणे असे सांगून हप्ते वसूल करणे सुरू … ऑटो पोस्टेला लावला तर 10 हजार भरून कोर्टातून सोडावा लागतो. त्यामुळे खासगी वाहन चालक काही न बोलता हप्ते देवून देतात… तर आज शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्याने ऑटो चालकाचा पाठलाग करून नवोदय विद्यालया जवळ ऑटो चालकाला थांबवून 300 रुपये हप्त्याची मागणी केली… यावेळी त्यास ऑटो चालकाने विचारले असता तर 300 रुपये दे आणि चालला जा.. याबाबत पावती मिळणार का असे विचारले असता पावती मिळणार नाही तर ऑटो पोस्टेला जमा करून 10 हजार रुपये कोर्टातून दंड भर असा दम भरला. हे कर्मचारी एका एजंटच्या माध्यमातून हा वसुलीचा फंडा सुरू आहे… यावेळी एका एजंटने सांगितले की माझ्याकडे ऑटो आहेत त्यानंतर आम्हाला जिल्हा वाहतून, ग्रामीण पोलीस स्टेशन , शहर पोलिस स्टेशन यांना हप्ते द्यावे लागते.. हे सर्व संभाषण सुरू असताना खामगावचे कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलिस अधिकारी सर्व संभाषण ऐकत होते…. त्यामुळे आता काय कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे..तर जिल्हाचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक या हप्तेखोरीला आळा घालतील का? असा प्रश्न खासगी वाहन चालक व नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे.. तर हप्ते कोण मागते किंवा ठाणेदार यांच्या मुकसमंतीने हे वसुलीचे प्रकार सुरू तर नाही ना ?असा प्रश्न उपस्थित होत आहे?

Previous articleनौकरी च्या नावावर आदिवासी महिलांचे लैंगिक शोषण
Next articleनमो आवास’ योजनेंतर्गत तीन वर्षात १० लक्ष घरे निर्माण होणार- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here