महाशिवरात्री निमित्त मार्कंडा या तीर्थावर जातं असतांना चंद्रपूर च्या मुलींचा असा करून अंत झाल्याने सर्वत्र हळहळ.
चंद्रपूर / गडचिरोली :-
महाशिवरात्री निमित्त मार्कंडा या तीर्थ स्थळी जत्रेत जातं असताना चंद्रपूर मार्गावरील सावली तालुक्यातील व्याहाड येथे वैनगंगा नदीच्या पात्रात चंद्रपुरातील कु. प्रतिमा प्रकाश मंडल (२३), कु. कविता प्रकाश मंडल (२१), कु. लिपिका प्रकाश मंडल (१८) या तीन बहिणी बुडल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या तिन्ही बहिणींचा युध्दपातळीवर शोध घेतला जात आहे. एकूण पाच जण बुडाले होते. त्यापैकी दोन जणांना वाचविण्यात यश आले आहे तर तिघींचा शोध सुरू आहे. सदर घटना ही आज दिनांक 26 फेब्रुवारी च्या दुपारच्या सुमाराची आहे.
चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील रहिवासी असलेले मंडल कुटूंबिय महाशिवरात्री निमित्त मार्कंडा येथे जाण्यासाठी निघाले होते. मात्र चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील सावली तालुक्यातील व्याहाड येथील वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलाखाली आंघोळीसाठी उतरले असता खोल पाण्यात गेल्याने कु.लिपिका मंडल, कु.प्रतिमा मंडल व कु.कविता मंडल या वैनगंगेच्या पाण्यात बुडाल्या या घटनेची वार्ता सर्वत्र पसरताच हळहळ व्यक्त होतं आहे.