चंद्रपूर – नारी शक्ति योगा ग्रुपला पाच वर्षे पूर्ण; महाशिवरात्री निमित्त यज्ञ पूजेचे आयोजन…
चंद्रपूर :- माजी नगरसेवक सुभाष कासनगोटीवार यांच्या तुकुम प्रभागातील नारी शक्ति योगा ग्रुपला पाच वर्षे पूर्ण झाली. या खास दिवशी महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर, पतंजली महिला शक्ती यांनी यज्ञ पूजनाचे आयोजन केले. या यज्ञ पूजनाला सौ प्रतिभा ताई रोकडे यांच्या नेतृत्वाखाली भरवण्यात आले.
News reporter :- अतुल दिघाडे
यज्ञ पूजनात सौ स्मिता ताई रेभंकर, नसरीन दीदी, श्री बबनराव अनमूलवार, सौ अपर्णा चिडे, सौ मंजुश्री कासनगोटीवार यांसह अनेक प्रतिष्ठित महिला उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे, तुकुम प्रभागातील शेकडो महिला आणि स्थानिक समुदायाचे प्रबोधन करणाऱ्या या कार्यकमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमात पतंजली महिला शक्तीच्या कार्याला वर्धन मिळवून, प्रभागातील महिलांना एकत्र आणण्याची आणि त्यांना सामाजिक, शारीरिक तसेच मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व सांगण्याची एक महत्त्वाची संधी मिळाली. महिलांचे सशक्तीकरण आणि योगाच्या माध्यमातून त्यांना एक नवा आत्मविश्वास मिळवून देण्याचा उद्देश या यज्ञ पूजनाचा होता.
सर्व उपस्थित महिलांनी आपल्या जीवनात योगाच्या महत्वावर चर्चा केली आणि यज्ञ पूजनाच्या माध्यमातून महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वात एक नवीन उर्जा प्राप्त केली. महिलांच्या एकत्र येण्याचा आणि सशक्त होण्याचा उद्देश याच यज्ञ पूजनातून साधला गेला.
या उपक्रमामुळे तुकुम प्रभागातील महिलांना एक नवीन दिशा मिळाली असून त्यांना एकात्मतेचे, सशक्तीकरणाचे आणि शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीचे महत्व पटवून दिले गेले.