सात दिवसात चौकशी अहवाल देण्याचे निर्देश असतांना जिल्हा उपनिबंधक सारडा यांच्याकडे बैंकेचा रेकॉर्ड नाही?
चंद्रपूर :-
चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या 360 पदाच्या नोकर भरतीत 100 कोटींपेक्षा जास्तीचा घोटाळा बैंकेचे सिईओ कल्याणकर, बैंक अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक यांनी केल्यानंतर त्या विरोधता आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे समन्वयक राजू कुकडे यांच्या नेतृत्वात बैंकेच्या मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलण व नंतर मनोज पोतराजे, रमेश काळाबाँधे यांच्या माध्यमातून आमरण उपोषण सुरु झल्यानंतर तब्बल 28 दिवस चाललेल्या आंदोलनाची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैंकेच्या संपूर्ण नोकर भरतीची एसआयटी चौकशी करण्याची आंदोलनकर्त्याची मागणी मान्य केली व तसे पत्र सहकार आयुक्त यांना दिल्यानंतर विभागीय सहनिबंधक वानखेडे यांनी चंद्रपूर जिल्हा उपनिबंधक सारडा यांना 7 दिवसात चौकशी करून अहवाल देण्याचे निर्देश दिले होते, या संबंधाने सारडा यांनी बैंकेत जाऊन सगळे रेकॉर्ड गोळा करण्याचे पत्र देऊन निबंधक कार्यालयात सिइओ कल्याणकर यांना हजर राहण्याचे निर्देश दिले होते, मात्र बैंकेचे सिइओ कल्याणकर हे चौकशी च्या धास्तीने पळापळ करत असल्याने चौकशी रखडली आहे, दरम्यान आरक्षण बचाव संघर्ष समितीचे सदस्य या संदर्भात शासन प्रशासनाकडे पाठपुरावा करत असून जर बैंकेचे सिइओ कल्याणकर हजर राहत नसतील तर नागपूर च्या विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती द्वारे पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा सहकार प्रशासनाला देण्यात आला आहे.
सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीत जो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला त्याबद्दल सर्वत्र तक्रारी देण्यात आल्या असून उच्चं न्यायालयात सुद्धा मागासवर्गीयांचं आरक्षण नोकर भरतीत हटविल्याने राजू कुकडे यांनी याचिका दाखल केली आहे, सोबतच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेत सुद्धा तक्रारी दिल्याने बैंकेच्या नोकर भरतीत जी मुल मुली यांना नियुक्त्या दिल्या त्यांच्यावर सुद्धा चौकशी ची टांगती तलवार आहे,कारण उच्चं न्यायालयाच्या 27 जानेवारी 2025 च्या निकालानंतर अध्यक्ष व संचालक यांचा अधिकार संपल्यानंतर सुद्धा त्यांनी 27 जानेवारीला रात्री 9.00 नंतर व दुसऱ्या दिवशी पहाटे पर्यंत नियुक्ती पत्र वाटप केले जे बेकायदेशीर आहे, शिवाय कुठल्याही नोकरी चे नियुक्ती पत्र व कार्यालयात रुजू व्हायच्या अगोदर त्यांना मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट व पोलीस सत्त्यापन आवश्यक असतांना ते सुद्धा जमा न करता परस्पर नियुक्ती पत्र देऊन त्यांना रुजू करून घेण्यात आले जे पूर्णतः नियंमबाह्य आहे आणि एकूणच सुरुवातीपासूनचं पैसे घेऊन वादात सापडलेली ही नोकर भरती रद्दचं होणार असल्याचे चित्र आहे, यामुळे कार्यवाहीच्या भीतीने बैंकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सिइओ चौकशी अधिकारी सारडा यांच्या कार्यालयात जातं नसल्याची माहिती आहे, मात्र येत्या चार पाच दिवसात बैंकेचे पदाधिकारी व अधिकारी यांनी चौकशीला दाद दिली नाही तर नागपूरच्या विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु करू असा इशारा समितीचे समन्वयक राजू कुकडे, सदस्य मनोज पोतराजे, रमेश काळबाँधे, संजय कन्नावार, सूर्या अडबाले, अनुप यादव, बंडू हजारें, राजू बिट्टूलवार, नभा वाघमारे, राजेश बेले, दिनेश एकवनकर, महेश वासलवार, अमन अंदेवार इत्यादीनी दिला आहे.