कुठल्याही सत्ताधारी यांना पायउतार करण्यासाठी त्यांचे विरोधक तीर्थयात्रा कां करतात, जनतेला पडलेला प्रश्न. 5 मार्चला मतदान
वरोरा प्रतिनिधी :-
कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील दोन ते तीन वर्षात कांदा घोटाळ्यानंतर तारण घोटाळा झाला आणि यामध्ये शेतकऱ्यांना समोर करून सत्ताधारी आणि अधिकारी कर्मचारी यांनी आपले हात साफ करून घेतले, यामुळे या बाजार समितीला भ्रष्टाचाराची वाळवी लागली की काय असा प्रश्न निर्माण होतं असतांना आता सभापती डॉक्टर विजय देवतळे यांच्या विरोधात तब्बल 18 पैकी 12 संचालकांनी बंड पुकारून ते तीर्थयात्रेला गेल्याची माहिती असून कुणाला पायउतार करण्यासाठी त्यांचे विरोधक नेमके तीर्थयात्रेला कां जातात हा प्रश्न मात्र जनतेच्या मनात निर्माण होतं आहे, दरम्यान कांग्रेस विरुद्ध इतर अशी बाजार समितीची झालेली निवडणूक आता अविश्वास ठराव घेतांना भाजप समर्थित डॉक्टर विजय देवतळे विरुद्ध इतर अशी होतं असल्याने राजकारणात नितिमत्ता संपली आणि सत्तेला सर्वोच्य स्थान निर्माण झाल्याने यापुढे सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा वाली कुणी उरला नसल्याची खंत मात्र आहे.
सभापती डॉक्टर विजय देवतळे हे संचालकांना विश्वासात घेत नाही, ते काही मर्जीतील संचालकांना घेऊन कामकाज करतात. समितीच्या नियमानुसार उप समित्यांचा कालावधी एक वर्षाचा असताना कालावधी संपून सुद्धा उपसमिती नव्याने गठीत केली नाही. कोणताही ठराव न घेतल्याने पूर्वीची उपसमिती कार्यरत आहे. बाजार समितीच्या नियमानुसार बाजार समितीचे दैनंदिन कामकाज चालत नाही. सभापती डॉक्टर विजय देवतळे यांच्या कार्यकाळात झालेली नियमबाह्य कामे आर्थिक घोटाळा त्यावरील चौकशी कायद्यानुसार केली नाही. बैल बाजार, नाफेड खरेदी च्या माध्यमातून जवळच्या संचालकांना घेऊन वसुली केल्या जात असल्याचा आरोप सदस्या तर्फे होत असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र इथे वेगळीच खिचडी शिजत असून हे सर्व बदल कारण्यामागे कुणाची तरी बदल्याची भावना असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये उलटंफेर करणारे कोण आहेत हे मात्र पडद्यामागे असल्याचे दिसत आहे.
डॉ. विजय देवतळे यांच्यावर अविश्वास कशासाठी?
जिल्ह्यातील सिडीसीसी बैंकेची जी 360 पदांची नोकर भरती घेण्यात आली त्यात सर्व संचालकांना एक कोटा देण्यात आला होता, मात्र काही संचालकांनी अगोदरचं कित्तेक लोकांकडून बैंकेत नोकरी लावून देण्यासाठी लाखों रुपये घेतलेले होते, मात्र मोजक्या संचालकांनी या नोकर भरतीत केलेला घोळ आणि सिइओ कल्याणकर यांनी परीक्षा घेणाऱ्या आयटीआय या कंपनीच्या माध्यमातून स्वतःचे व कंपनीचे उमेदवार जास्तीच्या प्रमाणात नोकरीवर घेतल्याने संचालकांना कमी कोटा मिळाला त्यात डॉ. विजय देवतळे यांचा एकच उमेदवार नोकरीवर घेण्यात आल्याची चर्चा असल्याने पैशासाठी सगळी मंडळी एकत्र आल्याने डॉ. देवतळे यांनी संताप व्यक्त केला होता, त्यामुळे बाजार समितीतूनच डॉ. देवतळे यांचा पत्ता कट करण्यासाठी त्यांना सभापती पदावरून खाली खेचण्याचा हा कट असू शकतो असे दिसत आहे. खरं तर विद्यमान संचालकांच्या कार्यकाळात व त्या अगोदर सुद्धा बाजार समितीत घोटाळे झाले मात्र कुठल्याही संचालकाने समोर येऊन त्या विरोधात आवाज उठवला नसताना आता सभापती पद बदलवून काय साध्य होणार हे मात्र कळायला मार्ग नसून येणाऱ्या 5 मार्च ला डॉ. देवतळे यांच्यावर येणाऱ्या अविश्वासामुळे काय राजकारणं निर्माण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.