Home चंद्रपूर आक्रोश :- भ्रष्टाचारी RTO किरण मोरे आंनद मेश्राम यांनी सिसिटीव्ही कैमेरे केले...

आक्रोश :- भ्रष्टाचारी RTO किरण मोरे आंनद मेश्राम यांनी सिसिटीव्ही कैमेरे केले गायब?

एसीबी ने RTO कार्यालयात जे दलाल कर्मचारी होऊन प्रशासनाच्या फाईल्स घेऊन फिरतात त्यांना अटक करावी म्हणजे झालं.

RTO चा पंचनामा भाग -2

चंद्रपूर च्या तेलंगना सिमा नाका असलेल्या लक्कडकोट येथे सहाय्यक निरीक्षक शिवाजी विभुते यांच्यासह एका खाजगी एजंट ला 500 रुपयाची लाच घेतांना अमरावती च्या एसीबी पथकाने रंगेहात अटक केल्यानंतर आता ही कारवाई आपल्यावर पण होऊ शकते या भीतीने भ्रष्टाचारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, सहाय्यक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांनी धास्ती घेत राजकीय सहारा घेतला आणि अटक होण्यापासून बचाव केला खरा पण मनसे वाहतूक सेनेतर्फे मोठे जनआंदोलन सुरु होणार असल्याने किरण मोरे आणि आंनद मेश्राम या प्रकरणातून सुटणार नाही असे संकेत मिळतं आहे, दरम्यान RTO कार्यालयात सिसिटीव्ही कैमेरे लावल्याचे कागदोपत्री दाखवून त्यांची बिले वाटप झाल्यानंन्तर सुद्धा इथे मुख्य कामकाजांच्या ठिकाणी मात्र सिसिटीव्ही कैमेरे गायब केले गेले असल्याने अवैध वसुली सिसिटीव्ही कैमेऱ्यात दिसू नये यासाठीची ही खबरदारी आहे कां असा प्रश्न निर्माण होत आहे, दरम्यान सर्वसामान्य वाहन चालक मालक यांच्या वाहनावर कारवाई चा धडाका करतांना त्यांच्याकडून सुद्धा तोडीपाणी करणारे RTO अधिकारी आपले पाप लपविण्यासाठी मात्र सिसिटीव्ही कैमेरे गायब करतात याचा अर्थ ह्यांना सरकारने केवळ जनतेची आर्थिक लूट करण्यासाठी आणि वसुलीतुन स्वतःच्या प्रापर्ट्या तयार करण्यासाठी इथे नोकरी दिली कां? हा सर्वसामान्य जनतेकडून आक्रोश व्यक्त होत आहे. दरम्यान एसीबी ने RTO कार्यालयात जे दलाल कर्मचारी होऊन प्रशासनाच्या फाईल्स घेऊन फिरतात त्यांना अटक करावी म्हणजे या कार्यालयातील दरमहा कोट्यावधी रुपयाची अवैध वसुली चा पर्दापाश होऊ शकतो अशी चर्चा आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून भ्रष्टाचारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, सहाय्यक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम आणि इतर परिवहन अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या कडे मागील वर्षाला तक्रार करण्यात आली होती, मात्र त्यावर कुठंहीली चौकशी झाली नाही, पर्यायाने हा मुद्दा ऐरणीवर तसाच असताना आता अमरावती च्या एसीबी पथकाने चंद्रपूर च्या RTO ने तेलंगना सिमा नाक्यावर जी अवैध वसुली गेली कित्तेक वर्षांपासून सुरु होती तिथे धाड टाकून 21 फेब्रुवारीला सहाय्यक निरीक्षक शिवाजी विभुते यांच्यासह एका खाजगी एजंट ला 500 रुपयाची लाच घेतांना रंगेहात अटक केली होती, दरम्यान ह्या गंभीर प्रकरणी मुख्य आरोपी RTO किरण मोरे व आंनद मेश्राम हेच असल्याने यांना खरेतर अटक व्हायला हवी होती, परंतु उलट तिसऱ्याच दिवशी अटकेत असलेले सहाय्यक निरीक्षक शिवाजी विभुते यांच्यासह एका खाजगी एजंट ला पण जामीन मिळाला आहे, त्यामुळे आता यानंतर काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

RTO कार्यालयातील सिसिटीव्ही कैमेरे चं काय आहे लफडं?

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात जो भ्रष्टाचार चालतोय तो सिसिटीव्ही च्या नजरेआड होतोय का हे फार मोठे कोडे असून जर प्रत्यक्षात दररोजची या कार्यालयात धांदल बघितली तर जे दलाल येथील कर्मचाऱ्यांच्या भूमिकेत आपली भूमिका बजावतात त्यांचे सिसिटीव्ही फुटेज मधील दृष्य बघितली तर या कार्यालयातील होणार भ्रष्टाचाराचा पर्दापाश झाल्याशिवाय राहणार नाही, पण आश्चर्यांची बाब अशी आहे की या कार्यालयाने दिनांक 6/7/2022 मध्ये नितीन आत्माराम अंभोरे यांना माहिती अधिकारात माहिती देतांना CCTV यंत्रणा लावण्याकरिता करण्यात आलेल्या निविदा व मंजूर निविदा बाबत माहिती दिली आणि एक प्रकारे या कार्यालयात CCTV लागले असल्याचे सुतोवात केले, मात्र याचं कार्यालयातील नौकरी करणारे अमित प्रेमराज काळे यांनी 20/4/2022 ला पोलिसांना आपले बयान देतांना म्हटले आहे की या कार्यालयात कोणतेही सिसिटीव्ही लावलेले नाही, मग लावलेले सिसिटीव्ही गायब झाले की गायब करण्यात आले हा गंभीर प्रश्न असून जर सिसिटीव्ही लावण्यात आले नाही तर सिद्धांत इन्फॉटेक यांच्या नावाने 61,920/- व 66,000/-, योगी इंटरप्रायजेस यांचे 70,300 /- रुपयाचे बिल, प्रभू कॉम्पुटर चे 2015 चे 1,16,725/- बिल असे सिसिटीव्ही कैमेरे विकत घेतल्याचे जे बिल माहिती अधिकारात समोर आले असतांना माहिती अधिकारात सिसिटीव्ही फुटेज का मिळतं नाही ? याचा अर्थ या कार्यालयात भ्रष्टाचार होतो आणि तो उघडकीस येऊ नये म्हणून आपल्या कार्यालयात सिसिटीव्ही नसल्याचे बयान येथील कर्मचारी पोलिसांना देतात आणि पोलीस त्यावर चौकशी न करता मोहर लावतात हे कुठल्या कायाद्यात आहे.

वाहन निरीक्षक गोविंद पवार यांच्यावर कारवाई कां नाही?

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात वाहन धारकांची मोठी आर्थिक लूट होत असतांना व याबाबत अनेक तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात दिल्या जातं असतांना या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यावर कार्यवाही का होत नाही हा गंभीर प्रश्न आहे, सन 2016 मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक जैन यांच्याकड़े नागपूर च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जबाबदारी आल्यानंतर त्यानी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर वसुली तेलंगना सिमा नाक्यावर चालवली होती त्याचा पर्दापाश करून तेव्हांचे निरीक्षक करमरकर जे सिमा नाक्यावर होते त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते, व नंतर निलंबानाची कारवाई करण्यात आली होती, त्यानंतर आता सहाय्यक निरीक्षक शिवाजी विभुते यांना सुद्धा इथेच अटक झाली, मात्र या प्रकरणात RTO निरीक्षक गोविंद पवार हे इथे ड्युटीवर असतांना त्यांना अटक झाली नसल्याची बाब समोर येत आहे. दरम्यान किरण मोरे व आंनद मेश्राम यांच्या भ्रष्टाचाराचे बिंग फुटू नये यासाठी तर निरीक्षक गोविंद पवार यांना सोडण्यात आले असावे? हा प्रश्न आहे, दरम्यान मोटर वाहन निरीक्षक गोविंद पवार यांच्या मोबाईल काल डिटेल्स च्या तपासानंतर त्यांना पण अटक होऊ शकते पण एसीबी च्या समोरील कार्यवाहीतून काय निष्पन्न होईल हे सांगता येत नाही अशी स्थिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here