सावली तालुका व शहर कमिटीतर्फे स्वाक्षरी मोहिमेची सुरूवात
सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यासाठी काँग्रेस पक्षाची स्वाक्षरी मोहीम
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी
मुल”-भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीतर्फे ई.व्ही.एम विरोधात सर्व निवडणुका बॅलेट पेपर झाल्या पाहिजे यासाठी संपूर्ण देशभरात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे, त्या निमित्याने सावली तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे काँग्रेस नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांचा मुख्य उपस्थित दिनांक १२ डिसेंबर २०२४ ला या मोहिमेला सुरवात करण्यात आली होती,करिता सावली तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्याची आढावा बैठक जनसंपर्क कार्यालय सावली येथे आज घेण्यात आली,व या मोहिमेला सुरवात करण्यात आली.
आयोजित बैठकीस तालुका अध्यक्ष नितीन गोहने,महिला तालुका अध्यक्षा सौ.उषाताई भोयर,शहराध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार,नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे,माजी सभापती प.स.राकेश पाटील गड्डमवार,माजी सभापती प.स.विजय कोरेवार,युवा तालुका अध्यक्ष किशोर कारडे,महिला शहर अध्यक्षा सौ.भारती चौधरी,शेतकरी राईस मिल अध्यक्ष मोहन गाडेवार,नगरसेवक नं.प.प्रितम गेडाम,सचिन संगीडवार, अंतबोध बोरकर,गुणवंत सुरमवार,नगरसेविका सौ.साधना वाढई ,सौ.प्रियंका रामटके,सौ.सिमा संतोषवार,सौ.अंजली देवगडे,सौ.ज्योती गेडाम,सौ.ज्योती शिंदे,मुन्ना पाटील भांडेकर,अनिल गुरुनुले,दिलिप फुलबांधे,संजय घोटेकर,सौ.कविता मुत्यालवार,सौ.शिला गुरुनुले,श्रीकांत बहिरवार,आकाश बुरीवार,किशोर घोटेकर तसेच तालुका काँग्रेस कमिटी तथा शहर काँग्रेस कमिटी तसेच काँग्रेस कमिटीचे सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी नगरपंचायत पदाधिकारी, नगरसेवक व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.