मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मनसेची वाढलीय ताकत…
चंद्रपूर/मूल:-
चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठया प्रमाणात अनेक राजकीय सामाजिक कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश होत आहे, त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात मनसेला चांगली संधी आहे, अशातच कांग्रेस भाजपचे वर्चस्व असणाऱ्या मूल तालुक्यातील टेकाडी या मोठ्या गावात मनसेने एंट्री केली असून तेथील कांग्रेस कमेटीचे मूल तालुका उपाध्यक्ष व लढाऊ नेतृत्व असणारे शरद गणवीर यांनी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह दिनांक 1 सप्टेंबर ला मनसे पक्षात प्रवेश केला, शरद गणवीर यांच्या मनसेत पक्ष प्रवेशाने मूल तालुक्यात मनसेची ताकत वाढली असून टेकाडी गावासह जवळपास 25 गावात मनसेच्या शाखा तयार करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे, दरम्यान शरद गणवीर यांची मनसे जनहीत कक्ष विभागाच्या बल्लारपूर विधनासभा अध्यक्ष पदी नियुक्ती सुद्धा करण्यात आली, यावेळी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, उपजिल्हा अध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे, बल्लारपूर तालुका सचिव राजू लांडगे, महाराष्ट्र सैनिक प्रतीक इत्यादीची उपस्थिती होती.
मूल तालुक्यातील टेकाडी या गावात समस्याचा डोंगर असून पिण्याचे शुद्ध पाणी मिळतं नाही, रस्ते नाल्या चा प्रश्न गंभीर बनला आहे, घरकुल धारकांना पैसे मिळाले नाही पण याकडे आमदार खासदार लक्ष देत नसल्याने आता जनतेसाठी लढणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ह्या आक्रमक पक्षात जाऊन गावाच्या समस्या सोडविण्यासाठी कांग्रेस चे तालुका अध्यक्ष शरद गणवीर यांनी आपल्या समर्थकासह मनसे पक्षात प्रवेश केला, दरम्यान शरद गणवीर यांची बल्लारपूर विधानासभा क्षेत्राचे मनसे जनहित कक्ष विभागाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती देण्यात आली, त्यामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात मनसेची ताकत वाढताना दिसतं आहे. यावेळी टेकाडी गावाचे प्रमुख कार्यकर्ते कुंदन मोहुर्ले, आशिष शेंडे, आवेश रामटेके, विनोद गोहणे, किसन गुरनुले, अशफाक शेख, सचिन मेश्राम, अतुल बोलीवार, होमेंद्र बोलिवार, रुपेश कोल्हे, सुमित कांबडी, नर्गिस सय्यद, उत्कर्षां पोटवार, समीक्षा जक्कुलवार, भाग्यश्री जक्कुलवार, गायत्री जक्कुलवार, नंदिनी मोहुर्ले, रुपाली जक्कुलवार, श्रावणी जक्कुलवार इत्यादीची उपस्थिती होती.