Home चंद्रपूर क्राईम ब्लास्ट :- पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत चाललाय झेंडीमुंडीचा जुगार, डिझेल चा...

क्राईम ब्लास्ट :- पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत चाललाय झेंडीमुंडीचा जुगार, डिझेल चा गोरखधंदा?

अवैध धंद्याचं माहेरघर बनलेल्या पडोली पोलीस स्टेशनचे वसुलीबाज मालामाल जनता बेहाल?

चंद्रपूर :-

चंद्रपूर शहराला लागून असलेल्या पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत छोटा नागपूर येथे झेंडीमुंडी चा जुगार जोरात सुरु असून दररोज लाखोंची उलाढाल सुरू आहे तर दुसरीकडे पडोली परिसरात शाकीर नावाचा परप्रांतीय डिझेल चा गोरखधंदा मागील अनेक वर्षांपासून करतं असून त्यांचेसोबत कामं करणारा एक सरदार पण आपले बस्थान मांडून आहे, त्यामुळे डिझेल चोरीचा धंदा दिवसेंदिवस विस्तारत आहे, मात्र यावर पडोली पोलीस विशेष लक्ष ठेऊन असून महिन्याकाठी यांची वसुली अवैध धंद्याना चालना देणारी ठरत आहे, दरम्यान आपल्या पोलीस कर्तव्यात कसूर करून अवैध धंदेवाईक यांना चालना केले तर जनतेला जणू बेहाल केले की काय अशी स्थिती दिसत आहे.

जिल्ह्यात औद्योगिक परिसरात वसलेलं पडोली पोलीस स्टेशन हे संवेदनशील असं मानलं जातंय, कारण या परिसरातून शहरांत एंट्री होते तर एमआयडीसी मधील उद्धयोगात चाललेल्या विबिध घडामोडी यासाठी पडोली पोलीस हे शहर व ग्रामीण ला जोडलेलं महत्वाचा दुवा ठरलं आहे, पण या परिसरात होतं असलेले अवैध धंदे आणि त्यातून होणारी उलाढाल हे बघून माणसाचं डोकं चक्रावून सोडेल एवढं मोठं घबाड इथे अस्तित्वात आहे, अशातच आता झेंडीमुंडी चे मास्टरमाईंड कैलास दुर्गे व झाकीर हुशेन हे कोंबड बाजारालाही मागे टाकणार कां याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहे, दरम्यान पोलिसांच्या मर्जिशिवाय कुठंलाही अवैध व्यवसाय चालेल हे शक्यच नाही त्यामुळे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यावर अंकुश लावेल का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here