Home चंद्रपूर चारगाव येथे ग्रा.पं. भवन व शाळा वर्ग खोलीचे लोकार्पण विधिमंडळ पक्षनेते आ.विजय...

चारगाव येथे ग्रा.पं. भवन व शाळा वर्ग खोलीचे लोकार्पण विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती

चारगाव येथे ग्रा.पं. भवन व शाळा वर्ग खोलीचे लोकार्पण

विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती

राजेंद्र मेश्राम

विशेष जिल्हा प्रतिनिधी 

चंद्रपूर

सावली:-  सावली तालुक्यातील मौजा चारगाव येथे राज्याचे विधिमंडळ पक्ष नेते तथा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाने मंजूर जन सुविधा योजने अंतर्गत नव्याने बांधकाम करण्यात आलेले ग्रामपंचायत भवन तसेच शाळा वर्ग खोलीचा आज लोकार्पण सोहळा विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात पार पडला.

आयोजित लोकार्पण सोहळ्यास अध्यक्ष म्हणून माजी जि.प. बांधकाम सभापती दिनेश चिटणुरवार,तालुका काँग्रेस अध्यक्ष नितीन गोहने,चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बंडू बोरकुटे,विस्तार अधिकारी प.स.सावली राजू परसावार, माजी प.स. सभापती विजय कोरेवार,माजी सभापती कृष्णा राऊत,माजी नगराध्यक्षा नं.प.सावली लता लाकडे,सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरषोत्तम चुदरी,सभापती कृ.उ.बा.स राजू ठाकरे, उपसभापती कृ.उ.बा.स प्रमोद दाजगाये, चारगाव सरपंच ज्योती बहिरवार,उपसरपंच राजू वलके,ग्राम अधिकारी वाघ ,माजी सरपंच तथा ग्रा.प.सदस्य आकाश बुरीवार,विधानसभा उपाध्यक्ष नितीन दुवावार, ग्राम काँग्रेस अध्यक्ष महादेव कुंभरे,ग्राम काँग्रेस अध्यक्ष मोखाडा अनिल मशाखेत्री,माजी कृषी.उ.बा.स.संचालक खुशाल लोडे,युवा पदाधिकारी श्रीकांत बहिरवार,आकाश येणप्रेडीवार,शरद मडावी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन पण बोलताना विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, मला मताधिक्यातून आशीर्वाद देऊन जनसेवेची संधी देणाऱ्या जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर असून संपूर्ण क्षेत्राचा सर्वांगीण विकास हा एकमेव दृष्टिकोन बाळगूनच मी कार्य करीत आहे. येत्या काळात चारगाव ग्रामपंचायत अंतर्गत अनेक विकास कामे होणार असून त्याकरिता मी प्रयत्नशील आहे. तर राज्यात बसलेले सरकार हे खोटारडे सरकार असून अनेक विभागाच्या निधीवर डल्ला मारून नागरिकांचा हक्क हिरावत आहे. सोबतच अवकाळी पावसाने सर्वत्र प्रचंड नुकसान केल्यामुळे शेतकरी बंधू हवालदिल झाले आहेत. या संदर्भात सरकारने गांभीर्याने घेऊन तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी मात्र तसे न करता सरकार भूलथापा देऊन दिशाभूल करण्याची कामे करीत आहे.

तर अध्यक्षीय भाषणातून माजी जि. प. बांधकाम सभापती दिनेश चिटनुरवार , तसेच माजी प. स. सभापती सावली तालुक्यातील नागरिकांच्या सोयीकरिता पूर्णत्वास आलेल्या विकास कामांचा आढावा उपस्थितां समोर मांडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि.प. शिक्षक साखरे, प्रास्ताविक सरपंच ज्योती बहिरवार तर आभार जि.प.शिक्षक कुळमेथे यांनी मानले. याप्रसंगी बहुसंख्येने गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here