Home चंद्रपूर भयानक :- त्या शिक्षिकेचा कसा झाला अपघात? व्हीडिओ वरून वास्तव आले समोर,

भयानक :- त्या शिक्षिकेचा कसा झाला अपघात? व्हीडिओ वरून वास्तव आले समोर,

शिक्षिकेच्या मृत्यूला गायत्री टायरचे मसादे कसे आहे जबाबदार ? का झाला नाही त्यांच्यासह स्कॉर्पिओ गाडी चालकांवर गुन्हा दाखल.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर शहरात नागपूर महामार्गावर दिनांक 04,,09,,2023, ला सकाळी 10,,00 ते 10,,30 च्या सुमारास 48 वर्षीय अनिता किशोर ठाकरे (राहणार श्रीकृपा कॉलोनी, जगन्नाथ बाबा नगर चंद्रपूर) या शिक्षिकेच्या अपघात होऊन तिचा मृत्यु झाला आणि सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली पण हा अपघात नेमका कसा झाला व कशामुळे झाला याचा शोध लागलीच गायत्री टायर च्या दुकानातील सीसीटीव्ही कैमेराच्या माध्यमातून लागला. पण पोलिसांनी कुणावरही गुन्हे दाखल केले नाहीत तर ज्या ट्रक च्या धडकेत शिक्षिकेचा अपघात झाला त्या ट्रक ड्राइवर ला दोषी पकडण्यात आले. पण वस्तुस्थिती वेगळी असुन गायत्री टायरच्या दुकानातून स्कॉर्पिओ रिवर्स घेतांना त्यामागे स्कूटीने चाललेल्या शिक्षिकेला आपल्या अंगावर स्कॉर्पिओ येईल या भीतीने तोल गेला आणि त्यांची स्कूटी भरधाव असलेल्या ट्रक ला धडकली आणि त्यातच त्यांचा अपघात होऊन मृत्यु झाला. हे वास्तव्य सीसीटीव्ही फुटेज वरून दिसत आहे. याचा अर्थ या अपघाताला ट्रक ड्राइवर नव्हे तर स्कॉर्पिओ ड्राइवर व रस्त्यावर दुकानदारी करणारे मालक मसादे जबाबदार आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

रामप्रसाद मसादे हे साई मंदिर येते पुजारी असुन त्यासोबत टे श्रीमंत लोकांच्या घरी पूजा अर्चा करतात व रग्गड पैसा कमावतात त्यामुळे इन्कम टॅक्स देण्याची आवश्यकता नसल्याने त्यांनी शहरात अनेक मोक्याच्या ठिकाणी आपले दुकान उभे करण्याच्या नादात याच नागपूर महामार्गावर गायत्री टायर चे दुकान येण्याजाण्याच्या रस्त्यावर बांधले होते व दलित समाजाच्या येण्याजाण्याचा मार्ग बंद केला होता. दरम्यान त्या लोकांना उच्च न्यायालयापर्यंत लढावं लागलं तेंव्हा कुठे ते दुकान न्यायालयाच्या आदेशाने तोडण्यात आले. महाराजांनी त्यापासून काही सबक घ्यायला हवी होती पण दुसरे दुकान सुद्धा महामार्गाच्या रस्त्यावर आल्याचे दिसत असुन गाड्यांची आलायमेंट करत असतांना गाड्या रिवर्स येताना अपुरा मार्ग असल्याने सरळ येणाऱ्या गाडय़ांना अकस्मात रिवर्स घेण्यात येणाऱ्या गाड्यांचा अंदाज येतं नाही पर्यायाने अप्लाय अंगावर गाडी येईल या भीतीने दोन चाकी वाहन चालक घाबरतात व बाजूला होण्याच्या नादात मागून येणाऱ्या हेवी वाहनांच्या आत येतात असाच प्रकार शिक्षिकेच्या बाबतीत घडला असुन यासाठी गायत्री टायर चे मालक रामप्रसाद मसादे जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र या संदर्भात पोलिसांनी तपास केला असल्याची माहिती असुन आता खरंच स्कॉर्पिओ चालक मालक व गायत्री टायर चे मालक मसादे यांच्यावर गुन्हा दाखल होणार का हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here