Home चंद्रपूर स्मरणीय :- रिसॉर्टमधून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांना कशी...

स्मरणीय :- रिसॉर्टमधून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांना कशी केली अटक?

पाटील यांच्या संपर्कात असलेले ते राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कोण?

चंद्रपूर :-

बीअर बारच्‍या परवान्यासाठी एक लाखाच्या लाचप्रकरणातील पसार झालेले उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजयकुमार जयसिंगराव पाटील यांना मंगळवारी पहाटे सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणी तालुक्यातील भिलार गावातील रिसॉर्टवरून चंद्रपूरच्या एसीबी टीम ने ताब्यात घेतेले. दरम्यान त्यांना शोधण्यास चंद्रपूर एसीबी टीमने काय प्रयत्न केले आणि कुठला पर्याय निवडला याबद्दल सर्वाना कुतूहल आहे, कारण सुरुवातीला कोल्हापुरातील एक अज्ञातस्थळी लपून बसलेल्या पाटील यांनी तीन-चार दिवसांपूर्वीच सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणी येथे मुक्काम ठोकला होता हे केवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या चंद्रपूर येथील काही अधिकाऱ्यांना, त्यांच्यासोबत संपर्कात असलेल्या वाईन शॉपी बिअर बार च्या संचालक व कुटुंबातील सदस्यांना माहीत होते आणि त्यांचा भ्रमणध्वनीवरून पाटील यांचेशी संवाद सुरु होता, नेमकं हेच गुपित एसीबीच्या टीम ने हेरले आणि त्यांनी त्यांच्या भ्रमणध्वनी च्या कॉल डिटेल वर लक्ष ठेऊन त्या दिशेने शोध सुरु केला आणि शेवटी सातारा जिल्ह्याच्या पाचगणी तालुक्यातील भिलार गावातील रिसॉर्टवरून चंद्रपूरच्या एसीबी टीम ने पहाटे सकाळी संजय पाटील यांना ताब्यात घेतेले.आता संजय पाटील यांच्या संपर्कात ते राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कोण अधिकारी होते याची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या सात दिवसांपासून फरार असलेले उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने पाचगणी येथून ताब्यात घेतल्यानंतर चंद्रपुरात सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी पाटील यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता १६ मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान ‘बियर शॉपी’च्या परवान्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणातील इतर आरोपी दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांना सोमवारी जामीन देण्यात आला, मात्र पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर ‘एसीबी’ने तपासाची चक्रे फिरवली आणि शेवटी ‘एसीबी’ पथकाने पाटील यांना पाचगणी येथून ताब्यात घेतले.

अधीक्षक संजय पाटील यांच्या संपतीची चौकशी होणार?

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बिअर बार, बिअर शॉपी, वाईन शॉपी व देशी दारू दुकानासाठी मंजुरी देण्याच्या नावाखाली अधीक्षक संजय पाटील यांनी कोट्यावधी रुपयाची अवैध वसुली केल्याप्रकरणी मनसे तर्फे संजय पाटील यांच्या कारभाराची एसआयटी द्वारे चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी केली होती, कारण दरमहा जवळपास 1 कोटी च्या वर वरील आस्थापनाकडून अवैध वसुली पण सुरु होती त्यात अधीक्षक संजय पाटील यांच्यासह निरीक्षक उपनिरीक्षक कार्यालयीन अधीक्षक व कर्मचारी यांचा सुद्धा सहभाग होता परंतु आता अधीक्षक संजय पाटील यांना अटक झाल्यानंतर एसीबी टीम संजय पाटील यांच्या संपतीची चौकशी करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here