Home वरोरा बेकायदेशीर जीवनज्योत व्यसन मुक्ती केंद्र चालविणाऱ्या अध्यक्ष टोंगे व इतर संचालकावर गुन्हे...

बेकायदेशीर जीवनज्योत व्यसन मुक्ती केंद्र चालविणाऱ्या अध्यक्ष टोंगे व इतर संचालकावर गुन्हे दाखल करा.

जनआक्रोश सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अँड अमोल बावणे यांची पोलीस अधिक्षक यांच्याकडे मागणी.

चंद्रपूर :-

वरोरा तालुक्यातील श्रीनगर सिटी बोर्डा येथील जिवनज्योत व्यसन मुक्ती केंद्राचे अध्यक्ष शाम टोंगे हे भरती केलेल्या पेंशटला ते वैद्यकिय उपचार व समुपदेशन न करता त्यांना गांजा,दारू, सिगारेट, खर्रा, तंबाखू देतात व टेक्निक पिंटू गोहणे यांच्या मार्फत विनाकारण रुग्णांना मारझोड करून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची संस्थेचे संचालक मोठी आर्थिक फसवणुक करीत असल्याने या प्रकरणी संस्था संचालकांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून अटक करण्यात यावी अशी मागणी जनआक्रोश सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अँड अमोल बावणे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे, यावेळी राजू कुकडे व पिडीत रुग्ण पंकज अनिल पडिले, शुभम शंकर थाटे, मनोज गिरमाजी येवले व अजय अशोक हलालवार लक्ष्मी शंकर थाटे, निलेश गुलाबराव पोगले उपस्थित होते.

जिवनज्योत व्यसन मुक्ती केंद्र, वरोरा श्रीनगर सिटी बोडा येथे व्यसनमुक्त करण्यासाठी पंकज अनिल पडिले, शुभम शंकर थाटे, मनोज गिरमाजी येवले व अजय अशोक हलालवार यांना भरती केले होते, सुरूवातीला सदर व्यसनमुक्ती केंद्राचे संचालकानी पालकांकडून ५००००/- व नंतर तुमचा मुलगा जास्त अॅडीक्ट आहे असे सांगून रू. २५०००/- व रू. २५०००/- अशी रक्कम गैरकायदेशिररित्या उकळली आहे. पण सदर केंद्रात भरती होवून सुध्दा कुणीही व्यसनमुक्त झालेले नाही. दरम्यान येथे चौकशी केली असता सदर केंद्रामध्ये रुग्णांना दारू, सिगारेट, तंबाखू, गांजा व खर्रा मोठया प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जाते. तसेच केंद्राचे अध्यक्ष हेच दारू पिवून राहतात व ते रुग्णांना दारूच्या नशेत मोठया प्रमाणात मारझोड केल्या जाते, रुग्ण हे मानसिकरित्या खचून विमनस्क अवस्थेत जात आहे. त्यामुळे भरती केलेली रुग्णांनी वरोरा पोलीस स्टेशनं येथे संस्थेच्या अध्यक्ष शाम टोंगे व इतर संचालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे,

जिवनज्योत व्यसन मुक्ती केंद्र, वरोरा येथे व्यसन सोडण्याकरिता व समुपदेशनाकरिता कित्तेक मुले भरती असतात, परंतु सदर व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष व इतर संचालक हे स्वतःच दारू पिवून असतात. त्यामुळे त्यानी व्यसनमुक्तीवर कार्य करण्याऐवजी ते रुग्णांना दारू, गांजा, सिगारेट, खर्रा, तंबाखू पुरवितात व शारीरिक व मानसिक त्रास देतात, व्यसनमुक्तीच्या नावावर भरती केलेले रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांची आर्थिक पिळवणुक सुरू आहे. तसेच सदर संचालक हे भरती झालेल्या रुग्णांना जनावरासारखे खोल्यामध्ये कुत्र्याच्या साखळीने बांधून कोंडून ठेवित असतात तसेच त्यांच्या प्रकृतीची देखभाल ही रजिस्टर्ड डॉक्टर कडून केल्या जात नाही. तसेच त्यांना ताजे अन्न देण्याऐवजी शिळे व अळयामिश्रीत अन्न देत आहे. हे जेवण हे सुध्दा रुग्णांनाच करायला लावल्या जात आहे होते. त्यामुळे व्यसनमुक्तीच्या नावाखाली रुग्णांनाकडून 30 हजार ते 1लाख रुपये घेऊन सुद्धा रुग्णांना व्यसनमुक्ती मिळत नाही उलट त्यांना मनाशिक शारीरिक त्रास देऊन त्यांची आर्थिक फसवणूक केल्या जात असल्याने जिवनज्योत व्यसन मुक्ती केंद्राच्या संचालकांची चौकशी व त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून गुन्हे दाखल करावे आणि त्यांना अटक करावी अन्यथा जनआक्रोश संघटनेच्या माध्यमातून जिवनज्योत व्यसन मुक्ती केंद्राच्या संचालकांविरोधात जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा जनआक्रोश सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अँड अमोल बावणे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाला दिला आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here