Home Breaking News शिक्षक दिनी आदर्श शिक्षक,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…..

शिक्षक दिनी आदर्श शिक्षक,गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…..

 

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  दि, 06,सप्टेंबर,योग्य शिक्षणातुन संस्कारी विद्यार्थी घडत असल्याने शिक्षणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. कठीण गोष्टी सोपी करून सांगणारे शिक्षक असतात. मनपा शाळांना उत्तम शिक्षक मिळाले आहेत त्यांच्या सहकार्याने शाळांचा उंचावण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी राणी हिराई सभागृहात आयोजित शिक्षक दिन समारंभात केले.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शिक्षक दिनी शाळेचा उत्कृष्ट निकाल देणारे,

News reporter :- अतुल दिघाडे

शिक्षक,चालु वर्षातील सेवानिवृत्त शिक्षक, १० वी व एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मनपा राणी हिराई सभागृहात आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आला होता.याप्रसंगी मार्गदर्शन करतांना आयुक्त म्हणाले की, मनपा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक शाळेच्या पटसंख्येत वाढ केली आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा ३०० विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे.

मनपाच्या २७ शाळा आहेत काही सुस्थितीत आहेत तर काही चांगल्या करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यापुढे मनपा शाळा खाजगी शाळांची बरोबरी करतील इतक्या दर्जेदार बनविण्याचे आवाहन आपल्यापुढे आहे आणि ते शिक्षकांच्या मदतीने पूर्ण होईल यात शंका नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.कार्यक्रमात शिक्षण प्रशासन अधिकारी नागेश नीत यांचा उत्कृष्ट कार्य करीत असल्याबद्दल आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

१० वीचा उत्कृष्ट निकाल देणारे शिक्षक भालचंद्र विजकापे,रवींद्र गोरे,कुंदा कोसारे,आशा चन्ने,शीला येरणे,सत्यवती महावादी,वर्षा आंबटकर ,एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट निकाल देणारे शिक्षक सचिन रामटेके, गुणवंत शिक्षक शरद शेंडे, सुनीता डबाले तसेच १० वीचा १०० टक्के निकाल देणारे अरुण वलके, सत्यवती महावादी या शिक्षकांचा तर १० वीत चांगले गुण मिळविणारे व एनएमएमएस परीक्षेत शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात सावित्रीबाई फुले शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व देशभक्तीपर गीत सादर केले. प्रास्ताविक नागेश नीत तर संचालन स्वाती बेतावार यांनी केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, मुख्यलेखा परीक्षक मनोज गोस्वामी,शहर अभियंता विजय बोरीकर, सहायक आयुक्त अक्षय गडलिंग,शुभांगी सूर्यवंशी, संतोष गर्गेलवार, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक नारायण कोटकर,प्रशासन अधिकारी नागेश नीत तसेच सर्व मुख्याध्यापक,शिक्षकगण,विद्यार्थी उपस्थीत होते.
#shikshakdin #teachersday #CMC #chandrapur #cmcommissioner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here