Home चंद्रपूर एल्गार :- शेतकऱ्यांचे थकीत पीक विम्याचे पैसे त्वरित द्या, अन्यथा मनसे स्टाईल...

एल्गार :- शेतकऱ्यांचे थकीत पीक विम्याचे पैसे त्वरित द्या, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन.

मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांचे शेतकऱ्यांच्या थकीत विम्यासंदर्भात मुख्यमंत्री यांना निवेदन.

चंद्रपूर /वरोरा :-

चंद्रपूर जिल्ह्यात मागील सन 2023-24 च्या खरीप व रब्बी हंगामातील थकीत पीक विम्याचे पैसे काही शेतकऱ्यांना मंजूर होऊन सुद्धा मिळाले नाही, जिथे सोयाबीन पिकांच्या पीक विम्याचे पैसे सरसकट शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात जमा करण्याची सरकारने घोषणा केली व त्यामधील बहुतांश शेतकऱ्यांना ते पैसे मिळाले परंतु कापूस व चणा या पिकांच्या बाबतीत मात्र विमा कंपनीने वेगळे निकष लावून ज्या शेतकऱ्यांनी सरकार व विमा कंपनीकडे तक्रारी केल्या त्यांनाच पीक विम्याचे पैसे मिळणार अशी अट घातली, दरम्यान जवळपास पन्नास टक्के शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या व त्यांना पीक विमा मंजूर झाला परंतु सरकारने मागील 31 ऑगस्टला सर्व शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात पीक विम्याचे पैसे टाकण्यात येईल असे सांगितले, पण प्रत्यक्षात कुणालाच पीक विम्याचे पैसे मिळाले नाही त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देऊन शेतकऱ्यांचे थकीत पीक विम्याचे पैसे येणाऱ्या 10 सप्टेंबर पर्यंत द्या अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा दिला आहे.

पीक विमा कशासाठी काढला जातो तर नैसर्गिक आपत्तींमुळं जर शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं तर त्याला सुरक्षा कवच म्हणून पिक विमा काढला जातो जातो, मात्र, अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही 2023-24 च्या खरीप व रब्बी हंगामातील पिक विम्याची मंजूर रक्कम मिळाली नाही, त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून स्थानिक प्रशासन व सरकार कडे पाठपुरावा सुरु आहे, दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण 192 कोटी पेक्षा जास्त रक्कम पीक विम्याकरिता सरकारने मंजूर केली, पण सरकार पीक विमा कंपनीला पैसे देत नाही तोपर्यंत पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे देणारं नाही हे उघड सत्य असतांना शिंदे सरकारने जाहीर केलेले पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना का दिले नाही व कधी देणारं याची निश्चित तारीख सरकारने निश्चित करावी व येणाऱ्या 10 सप्टेंबर पर्यंत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बैंक खात्यात टाकावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना वरोरा येथील उपविभागीय कार्यालयासमोर वरोरा भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन ठिय्या आंदोलन व त्यानंतर मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा दिला आहे. यावेळी मनसेचे पियुष धुपे, अतुल दिघाडे व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. दरम्यान निवेदनाच्या प्रती कृषी आयुक्त पुणे, कृषी जिल्हा अधीक्षक चंद्रपूर, व्यवस्थापक, पीक विमा कंपनी, चंद्रपूर यांच्याकडे देण्यात आल्या आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here