Home वरोरा दिनविशेष :- श्रावन महिन्यातील बैलपोळा का साजरा केल्या जातो, कारण काय?

दिनविशेष :- श्रावन महिन्यातील बैलपोळा का साजरा केल्या जातो, कारण काय?

मोवाडा गावातील परंपरा अजूनही सुरूच, बैलाच्या सणाचा उत्सव जोरात साजरा.

टेमुर्डा प्रतिनीधी :-
धनराज माधव बाटबरवे

आपल्या देशात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशूपालन या व्यवसायाकडे पाहिले जाते. याच व्यवसायाचा भाग म्हणजे बैल पाळणे. याच बैलांमुळे शेतकऱ्याला शेताची कामे करणे अतिशय सोपे होते. त्यामुळे वर्षाचा एक दिवस तरी त्याची या कष्टदायक कामापासून सुटका व्हावी आणि त्याची वर्षभर केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जावी यासाठी बैलपोळा साजरा केला जातो.

ज्यांच्याकडे बैल नसतात असे लोकं मातीचा अथवा लाकडाच्या बैलांची प्रतीकात्मक पूजा करतात. या दिवशी बैलांकडून कोणतेही कष्टाचे काम करून घेतले जात नाही. पोळ्याच्या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद आणि तुपाने शेकतात. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घालतात.

बैलांना जेवणासाठी या दिवशी पुरणपोळी करत नैवेद्य दाखवला जातो. प्रत्येक शेतकरी आपल्या शेतकरी बैलांचा साजशृंगार करतात. त्यांची मिरवणुक काढतात. घरातील स्त्रिया बैलांचे औक्षण करतात. या दिवशी प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. अनेक गावांमध्ये पोळ्याला शर्यतींचे आयोजन करण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here