Home वरोरा स्तुत्य उपक्रम :- सालोरीतील मनसे पदाधिकाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला पोळा.

स्तुत्य उपक्रम :- सालोरीतील मनसे पदाधिकाऱ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला पोळा.

पोळ्यात बैलाला तुतारी न टोचता वाजत गाजत व बैल जोडीना घराघरात पाठवून केली पूजा. सर्वत्र कौतुक 

वरोरा :-

महाराष्ट्रात सर्वत्र पोळ्याचा उत्सव सर्व शेतकरी बंधूनी साजरा करून बैल जोडीची पूजा करून आपल्या साथीदाराला जणू मानवंदना दिली, कारण बैल हेच खरे शेतकऱ्यांचे सारथी असतात व त्यांच्याच मेहनतीने शेतीत धान्य उगविण्याचं त्याचं संगोपन करून शेतातून धान्य घरी आणत पर्यंत व त्यानंतर मार्केट मध्ये नेण्यापर्यंत बैलाची साथ शेतकऱ्यांना असतें, पण पोळ्याच्या दिवशी ज्या ठिकाणी पोळा भरतो त्या ठिकाणाहून पोळा सुटल्यानंतर जणू बाहेर निघायची स्पर्धा लागते आणि माझी जोडी समोर करण्याच्या नादात शेतकरी मग बैलांना तुतारी टोचून पाळवतात ही अत्यंत वाईट प्रथा असून वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना किमान त्यांच्या पोळ्याच्या सणाला सन्मान झाला पाहिजे त्याची ओवाळणी व त्यांना नैव्यद देऊन त्यांची पूजा झाली पाहिजे ही लोकभावना लक्षात घेता सालोरी तेथील मनसे पदाधिकाऱ्यांनी एक अनोखा उपक्रम राबवून शेतकऱ्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे.

सालोरी येथील मनसेचे तालुका सरचिटणीस संदीप मोरे, विभाग अध्यक्ष रंगनाथ पवार, शाखा पदाधिकारी राजू रंदई गणेश तुमसरे एकनाथ पढाल, संजय मगरे प्रशांत ढोके आशिष मोरे, निखिल मोरे, आकाश मोरे, रमेश निखाते, संकेत डोंगरे व इतर मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी गावात भरलेल्या बैल पोळ्याला आपापली बैल जोडी पोळ्यातून न पळवता वाजत गाजत पोळ्यातून काढत व घरोघरी पोहचवून बैलांची पूजाअर्चा व त्यांना नैवेद देऊन बैलाचा सन्मान केला, गावातच काही शेतकऱ्यांनी बैल जोडी पोळ्यातून पळवून बैलांना तुतारी टोचली परंतु मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जो सन्मान बैलांना मिळवून देऊन शेतकऱ्यांसमोर जो आदर्श ठेवला त्यांचे कौतुक सर्वत्र होतं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here