Home वरोरा लक्षवेधक :- शेख जैरुद्दीन उर्फ छोटूभाई यांच्या नेतृत्वात बैलबंडी ट्रॅक्टर मोर्च्याने वेधले...

लक्षवेधक :- शेख जैरुद्दीन उर्फ छोटूभाई यांच्या नेतृत्वात बैलबंडी ट्रॅक्टर मोर्च्याने वेधले लक्ष.

वरोऱ्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा बैलबंडीसह सहभाग, कुटुंबातील लहान मोठे सदस्य सहभागी. १५ दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचा अल्टीमेट.

वरोरा:-

वरोरा शहर आणि तालुक्यातील शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि पुनर्वसन गावातील नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी माजी सभापती तथा काँग्रेस कामगार कर्मचारी विभागाचे राज्य उपाध्यक्ष शेख जैरुद्दीन उर्फ छोटूभाई यांच्या नेतृत्वात बैलबंडी व ट्रॅक्टर मोर्च्याचे भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात पळसगाव रानतळोधी या गावातील नागरिकांनी मोठा सहभाग घेतला, विशेषतः खेड्यांतील शेतकऱ्यांनी आपल्या बैलबंडीसह या मोर्चात भाग घेऊन आपला संताप व्यक्त करत घोषणाबाजी केल्याने या मोर्चामुळे सर्वांचे लक्ष वेधले होते.

हा मोर्चा डॉ आंबेडकर चौकातुन निघून थेट उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला, यावेळी मोर्च्याचे नेतृत्व करणारे छोटूभाई यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रशासनासमोर व्यथा मांडल्या. या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पळसगाव आणि रानतळोधी पुनर्वसन गावातील नागरिकांच्या समस्यांचा समावेश आहे. सोबतच अवैध उत्खननाविरुद्ध कठोर कारवाई करा, प्रलंबित कृषी पंप कनेक्शन पूर्ण करा, अतिक्रमणधारकांना पट्टे द्या आणि वाढलेल्या विद्युत दरांमध्ये कपात करा हे मुद्दे समाविष्ट आहेत.

दरम्यान या मोर्च्या आंदोलनाची दखल घेऊन येत्या १५ दिवसांत मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही असा इशारा शेख जैरुद्दीन उर्फ छोटूभाई यांनी प्रशासनाला इशारा दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून मोर्चाला सुरवात झाली. डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. शेतकरी, शेतमजूर, अतिक्रमणधारक, अपंग, आणि निराधार प्रकल्पग्रस्तांनी मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, मोर्चाच्या आयोजनासाठी नागरिकांनी स्वतःच्या बैलबंडीसह सहभाग नोंदवला, ज्यात महिलांची व लहान मुलांची मोठी उपस्थिती होती.

मोर्चाच्या समारोपात उपविभागीय अधिकारी झेनिथ चंद्र यांना शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. त्यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला आणि संबंधित विभागांना माहिती पाठवून लवकरात लवकर समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी छोटूभाई शेख आणि इतर शिष्टमंडळाचे सदस्य उपस्थित रुहिना छोटूभाई शेख माजी महिला बालकल्याण व शिक्षण सभापती वरोरा, वसंतराव विधाते, कैलासजी कुंमरे, सरपंच रानतळोदी रघुनाथ दडमल, जावेद अंसारी, फारूक शाह, मोहसीन पठाण, शब्बीर शेख, शेषराव भोयर, भोयर बाई सरपंच आशी, माजी सरपंच पूर्णिमा गाऊत्रे पळसगाव, महेश धुर्वे प्रफुल्ल शेडमाके, विलास आत्राम, अंकुश परचाके, रमेश मेश्राम, अक्षय मडावी, कैलाश रानतळोदी येथील मंगलदास आत्राम, आनंदराव चिडाम, गोविंदा काजल, नितेश आसेकर, शुभांगी कुंभारे, नासिर भाई शेख, यावेळी शेतकरी शेतमजूर महिला कामगार. प्रकल्पग्रस्त पुनर्वसन गावातील नागरिक महिला कामगार लहान मुले जवळपास 2 हजाराच्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी होते यावेळी छोटूभाई यांनी उपस्थित. नागरिकांचे आभार व्यक्त करताना सांगितले यापुढे सदर मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन व उपोषण आंदोलन करण्यात येईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here